Deepika Padukone Movie Gehraiyaan: अमेझॉन प्राइम व्हिडिओने (Amezon Prime video) आज बहुप्रतीक्षित अमेझॉन ओरिजनल मूव्ही गेहराईयांचा ट्रेलर (Gehraiyaan trailer viral) प्रदर्शित केला. गुंतागुंतीची आधुनिक नाती, प्रौढ होणं, काही गोष्टी सोडून देणं आणि आपल्या आयुष्याचं नियंत्रण आपल्या हातात घेणं असं बरंच काही पाहायला मिळणार आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण (Deepika padukone) , सिद्धांत चतुर्वेदी आणि अन्यया पांडे यांच्या प्रमुख भूमिका असून त्याचबरोबर धैर्य कारवा, नसिरूद्दीन शहा आणि रजत कपूर यांच्याची महत्त्वाच्या भूमिका आहेत. वायकॉम 18, धर्मा प्रॉडक्शन्स आणि शकुन बत्रा यांच्या जॉस्का फिल्म्सची संयुक्त निर्मिती असलेल्या या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर केवळ अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 11 फेब्रुवारी, 2020 रोजी जगभरातील 240 देशांत होणार आहे.
या सिनेमाविषयी दीपिका ‘गेहराइयामधली माझी व्यक्तीरेखा- अलिशा मला खूप जवळची आहे आणि निश्चितपणे मी आतापर्यंत साकारलेल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक आहे. एकाचवेळेस मजेदार आणि तितकीच आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रत्येक भूमिकेचा संघर्ष, मार्ग, सच्चा, नैसर्गिक आणि आपलासा वाटणारा आहे. प्रेक्षकांना आपलासा वाटेल असा प्रवास घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नातेसंबंध आणि मानवी नात्यांबद्दल भाष्य करण्यात शकुन कुशल आहे. गेहराइंयामध्ये त्यानं सर्वांना आपलीशी वाटेल अशी गोष्ट गुंफली आहे
सिद्धांत म्हणाला, आपल्या सर्वांचं व्यक्तिमत्त्व थोडंफार झायनसारखंच असतं. त्याच्या महत्त्वाकांक्षा, इच्छा, स्वप्नांप्रती ध्यास आणि अवघड पर्याय समोर आल्यानंतर होणारा संघर्ष सर्वांनाच आपलासा वाटणारा आहे. ‘गेहराइंयाचे सहकलाकार आणि तंत्रज्ञांबरोबर काम करण्यासाठी मला सर्वोच्च आनंद देणारं होतं. शूटिंग कधीच संपू नये असं मला वाटत होतं. गेहराइंयाच्या गोष्टीत एकप्रकारचा वास्तववादीपणा आहे. हा सिनेमा नात्यांची गुंतागुंत उलगडत असला, तरी प्रेमात जाणवणाऱ्या थरारावर, आपला शोध घेण्यावर तसंच मार्ग तयार करण्यावर तो भाष्य करतो. असं अनन्यानं सांगितलं आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.