Mahima Chaudhary Breast Cancer: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून तिनं प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत पोस्ट शेयर करुन त्याविषयी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महिमानं या (Anupam Kher) जीवघेण्या आजारावर उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. तिला कॅन्सर झाला आहे (Bollywood Actress) असे कळताच चाहत्यांनी तिच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. ती या आजारातून लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना त्यांनी देवाकडे केली आहे. अनुपम खेर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून (social media news) चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. त्यावर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स करत महिमाला मानसिक आधार दिला आहे.
यापूर्वी अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांना देखील या जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागला होता. त्यांनी मोठ्या धीरानं या आजाराला तोंड दिले. अनुपम यांनी शेयर केलेल्या त्या व्हिडिओमधून महिमाला हिरो असे म्हटले आहे. महिमानं देखील तो व्हिडिओ तिच्या इंस्टावरुन शेयर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये महिमाचा बाल्ड लूक लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. यासगळ्यात दिलासादायक बाब अशी की, स्क्रिनिंगच्यावेळी महिमाला आपल्याला कॅन्सर असल्याचे कळले होते. तिनं वैदयकीय उपचार घेऊन त्याजागेवरील कँसर सेल हटविल्या आहेत.
अनुपम यांनी साडेसात मिनिटांचा हा व्हिडिओ तयार केला असून त्यातून त्यांनी महिमाविषयी सांगितले आहे. तिनं कशाप्रकारे या आजाराचा सामना केला त्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. महिमा गेल्या अनेक दिवसांपासून विग लावून फोटोशुट करत होती त्यामुळे तिचा बाल्ड लूक हा काही प्रेक्षकांसमोर आला नसल्यानं तिच्या या गंभीर आजाराविषय़ी देखील कुणालाच काहीही माहिती नसल्याचे दिसून आले आहे.
अनुपम यांनी लिहिलं आहे की, मी एका चित्रपटाच्या निमित्तानं फोन केला होता. त्यात महिमानं काम करावं अशी माझी इच्छा होती. तिला ज्यावेळी फोन केला तेव्हा तिनं मला कॅसर झाल्याचे सांगितले. तिचा संघर्ष, दृष्टिकोन हे सारं मला प्रेरणा देणारं होतं. त्यानंतर ही गोष्ट मी तिला इतरांना सांगण्यासाठी प्रवृत्त केल्याचे खेर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.