Tollywood Movie; टॉलीवूडच्या यशचा केजीएफचा दुसरा चॅप्टर प्रदर्शित झाला (KGF 2) आणि त्यानं बॉक्स ऑफिसचा कब्जा घेतल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यापासून केजीएफनं धुमाकूळ घातला आहे. त्याच्यापुढे बॉलीवूडचे जे (Box Office) चित्रपट प्रदर्शित झाले त्यांना मात देण्याचे काम केजीएफनं केले आहे. (Bollywood Movie) त्यानं आतापर्यत तीनशे कोटींहून अधिक कमाई केली आहे. यासगळ्यात गेल्या शुक्रवारी शाहिद कपूरचा जर्सी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला (entertainment news) आहे. केजीएफमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता तो प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यातील अभिनेत्री मृणाल ठाकूर या अभिनेत्रीनं तिला ज्याप्रकारे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुळ टॉलीवूडच्या (Tollywood movie) जर्सी नावाच्या चित्रपटावर आधारित हिंदी रिमेक तयार करण्यात आला आहे. त्यात मुख्य अभिनेत्याची भूमिका शाहिद (Shahid kapoor) कपूरनं केली असून त्याच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत त्याचे वडील पंकज कपूर (pankaj kapoor) यांनी भूमिका साकारली आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाहिदच्या जर्सीचे प्रेक्षकांना वेध लागले होते. कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला होता. त्यानंतर कित्येक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता एकापाठोपाठ एक दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली आहे. जर्सीच्या प्रमोशनसाठी त्यातील मुख्य अभिनेत्री मृणाल ठाकुरनं तिला सामोऱ्या जाव्या लागलेल्या बॉडी शेमिंगविषयी सांगण्यात आले आहे. एका मुलाखतीतून तिनं याविषयी सांगितलं आहे.
लोकांनी मला काही सहजासहजी स्विकारलं नाही. आपल्याकडे अभिनेत्रीच्या दिसण्याला फार महत्व आहे. तिला त्यावरुन जज करण्याचे प्रमाणही मोठं आहे. त्यामुळे लोकांना बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींचा प्रवास सोपा वाटतो मात्र तसे नाही. त्यासाठी अभिनेत्रींना काय सहन करावं लागतं याविषयी त्यांना माहिती नसते. माझ्याबाबत एक विचित्र प्रकार घडला होता. त्याची आठवण आजही मनात आहे. लोकं तुमच्या दिसण्यामुळे तुम्हाला कशाप्रकारे ट्रोल करु शकतात. हे त्यातून दिसून आले होते. मला लोकं मडकं म्हणून चिडवायचे. माझ्या शरीरावरुन मला कित्येकदा ट्रोल करण्यात आले. मी त्याचा फार गांभीर्यानं विचार केला नाही. पण त्याचा परिणाम माझ्यावर झाला. मी कसं दिसावं हे मी नाहीतर लोकं ठरवतात. हेच किती भयानक असल्याचे यावेळी मृणालनं सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.