Kashmir Files साठी लागली 4 वर्ष, शेवटच्या दिवशी निघाला अजबच फतवा

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मिर फाईल्स (Bollywood movie) नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
the kashmir files
the kashmir filesesakal
Updated on

The kashmir Files: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मिर फाईल्स (Bollywood movie) नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यावरुन भलेही वाद तयार होत असला तरीही कित्येकांनी (Bollywood news) थिएटरमध्ये जावून हा चित्रपट पाहिला आहे. त्यात दाखवण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाच्या कथेनं प्रेक्षकांना भारावून टाकलं (Entertainment news) आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतरे सोशल मीडियावरुन व्हायरल होताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी द काश्मिर फाईल्सची(The kashmir files movie) निर्मिती कशाप्रकारे झाली याविषयीच्या गोष्टी प्रेक्षकांना सांगितल्या आहेत.

अग्निहोत्री आणि चित्रपटातील अभिनेत्री पल्लवी जोशी (Actress pallavi Joshi) हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पीव्हीआरमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी काही प्रेक्षकांशी संवाद साधला. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर अग्निहोत्री म्हणाले की, द काश्मिर फाईल्स सारख्या विषयांवर चित्रपट बनवणं सोपं काम नाही. त्यासाठी खूप अभ्यास लागतो. मेहनत लागते. संशोधन करण्याची तयारी असावी लागते. यापूर्वी कुणीही अशाप्रकारच्या ज्वलंत विषयावर कलाकृती तयार केलेल्या नाहीत. मला ही कलाकृती तयार करण्यासाठी तब्बल चार वर्षांचा कालावधी लागला. मला या चित्रपटामध्ये जे काश्मिरी पंड़ित दाखवण्यात आले आहे त्यापैकी सुरेंद्र कौल हे अमेरिकेतील ह्युस्टन याठिकाणी भेटले. त्यांनी मला जे सांगितलं ते हादरवून टाकरणारं होतं.

आपल्या बांधवांना जे काही भोगावे लागले ते लोकांसमोर येण्याची गरज आहे. अजूनही कित्येकांना काश्मिरच्या खोऱ्यात काय झाले होते याविषयी माहिती नाही. त्यानंतर मी काश्मिरी पंडितांवर चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे माझी दोन वर्षे वाया गेली. तर दोन वर्षे केवळ चित्रिकरण सुरु होते. त्यातही कित्येक वादांना, अडचणींना मला सामोरं जावं लागलं होतं. माझ्या पत्नीचा या प्रोजेक्टसाठी सल्ला घेतला तेव्हा तिनं सांगितलं की, जर सैनिक देशाची सेवा करु शकतात., देशासाठी लढू शकतात तर आपणही का नाही? तेव्हा माझा निर्णय पक्का झाला.

the kashmir files
The Kashmir Files : काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाहीतर..., सावंतांची टीका

काश्मीरमध्ये चित्रिकऱण करणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्याठिकाणचे वातावरण पूर्णत वेगळे आहे. याशिवाय स्थानिकांचा आम्हाला होणारा विरोधही मोडून काढायचा होता. त्यात बराचसा वेळ गेला. मात्र काही काळानं आम्हाला त्यांच्याकडून सहकार्य मिळाले. आम्ही त्यांच्याशी संवाद केला. त्याचाही आम्हाला फायदा झाला. अद्यापही माझ्या तरुण बांधवांना कित्येक गोष्टी ज्या काश्मिर पंडितांविषयीच्या आहेत. त्या माहिती नाही. तेव्हा मला त्या आवर्जुन आजच्या पिढीला सांगाव्याशा वाटल्या. चित्रपटाच्या निर्मात्या आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी सांगितलं की, आम्ही जेव्हा शुटींग करत होतो तेव्हा एका वेगळ्याच फतव्याला आम्हाला सामोरं जावं लागलं होतं. माझ्या आणि विवेक अग्निहोत्रीच्या विरोधात होते. हा फतवा काश्मिरमध्ये शुटिंग करण्याच्या शेवटच्या दिवशी जाहिर करण्यात आला होता. शुटिंग थांबवण्याचे, काश्मिर फाईल्स बनवण्यावरुनही आम्हाला अनेकदा धमक्या मिळाल्याचे यावेळी जोशी यांनी सांगितले. 11 मार्चला द काश्मिर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

the kashmir files
The Kashmir Files: रिलीजच्या एक दिवस अगोदरच तो सीन हटवला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()