Russia Ukraine War: युक्रेनच्या समर्थनार्थ प्रियंकाची पोस्ट, केलं मोठं विधान

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजुनही सुरुच आहे. ते थांबण्याचे काही नाव घ्यायला तयार नाही.
Actress Priyanka Chopra
Actress Priyanka Chopraesakal
Updated on

Russia Ukraine war: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजुनही सुरुच आहे. ते थांबण्याचे काही नाव घ्यायला तयार नाही. यासगळ्यात बॉलीवूड आणि (Bollywood News) हॉलीवूडमधल्या सेलिब्रेटींनी रशियावर सडकून टीका केली आहे. त्यामध्ये अनेक दिग्गज सेलिब्रेटींचा समावेश आहे. आता बॉलीवूडची स्टार (Entertainment News) अभिनेत्री प्रियंका चोप्रानं (Actress Priyanka Chopra) युक्रेनला पाठींबा देत असल्याचे सांगत रशियावर तोफ डागली आहे. येत्या काळात रशियाला आणखी मोठया समस्येला सामोरं जावं लागणार असल्याचे प्रियंकानं म्हटलं आहे. यापूर्वी अमेरिकेच्या गायिकेनं रशियाच्या अध्यक्षांना धारेवर धरले होते. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 34 दिवस पूर्ण झाले आहेत.

जगभरातील अनेक देशांवर रशिया आणि युक्रेनच्या य़ुद्धाचे विपरित परिणाम झाले आहे. एक महिन्यापासून जगभरातील अनेक मान्यवरांनी त्याबद्दल पुतीन यांच्यावर सडकून टीका केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन मोहिम अंतर्गत युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात आणले होते. केवळ भारतीयच नाहीतर इतर देशाच्या विद्यार्थ्यांना देखील मोदींच्या मिशन गंगानं त्यांच्या मायदेशात पोहचवले होते. यासगळ्या परिस्थितीवर सध्या हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविणाऱ्या प्रियंकानं पुतीन यांच्यावर टीका केली आहे.युक्रेनची बाजु घेत आणखी कशाप्रकारे कार्यवाही करता येईल यावर टिप्पणी केली आहे.

Actress Priyanka Chopra
Russia Ukraine War : चर्चेतूनच युद्ध थांबेल

अमेरिकेच्या एका कलाकारानं यावेळी ऑस्करवर बंदी घालण्यात यावी. आणि जो शो झालाच तर त्यामध्ये युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांना निमंत्रित करण्यात यावं असं सांगण्यात आलं होतं. प्रियंकानं युक्रेनमधील निर्वासितांच्या बाजुनं प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याप्रती काळजीही व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक देशांतील व्यक्तींना युक्रेनप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. युक्रेनमधील शरणार्थींना मदत करण्यासाठी आता ग्लोबल सिटिजन संस्थानाच्या माध्यमातून एक वेगळा उपक्रम सुरु करण्य़ात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.