Pathaan: 'पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता अवघे काही आठवडे उरले आहेत. पण चित्रपटातील 'बेशरम रंग ' गाण्यावरून सातत्याने वाद निर्माण होत आहेत.
दीपिकाच्या भगव्या बिकिनीबद्दल अनेक अभिनेत्री उघडपणे बोलल्या आहेत. आता बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रीना रॉय यांनीही आपले मत मांडले आहे.(Bollywood Actress Reena Roy Opens up on Pathan Movie Deepika's Bhagwa Bikini Controversy)
बॉलिवूड गेल्या काही काळापासून प्रचंड नकारात्मकतेतून जात आहे. चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचा जणू विडाच कुणीतरी उचलला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठाण' चित्रपटालाही या वादळानं घेरलं आहे.
यामध्ये दीपिकाने केसरी रंगाची बिकिनी घातली आहे आणि या केसरी रंगावरून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असा आरोप केला गेला आहे. चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर शाहरूख खानला जिवे मारण्याची धमकी पण दिली गेली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रीना रॉय यांनी आपली भूमिका याबाबत स्पष्ट मांडली आहे.
रीना रॉय म्हणाल्या,'जेव्हाही मी हे सर्व ऐकते तेव्हा मला माझ्या आईची एक गोष्ट आठवते. आई म्हणायची की जिथे शिजेल तिथेच जळणार. आम्हा या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल जिथे तुम्ही तुमचा सर्वोत्तम काम दाखवू शकता, त्याचा फायदा आहेच पण कधी कधी त्यामुळे तुम्हाला काही चटकेही सहन करावे लागतात. पण हे चटके सहन करत बसायचं नाही''.
''अनेकदा तुम्ही मेहनतीनं कमावलेलं तुमचं नावही तुमचा सर्वात मोठा शत्रू बनतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. काहीवेळा लोकांना विनाकारण राग येतो. हे जीवन आहे. प्रतिष्ठा मिळते तेव्हा ती सोबत समस्या देखील घेऊन येतेच''.
दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावरून झालेल्या वादावर रीना म्हणाल्या,'' बघा, ज्यांना आवडत नाही, ते बोलतील. ज्यांना बोलायचे आहे ते बोलत राहतील. आम्ही काय करू शकतो? आमच्या वेळी कोणी आक्षेप घेतला नाही, त्यामुळे आता मला काही फरक पडत नाही. लोकांनी आम्हाला पसंत केले. मात्र, यात मी काही बोलले तर मुद्दा कुठला कुठे नेला जाईल. अभिनय क्षेत्रात या गोष्टी सहन कराव्या लागतात''.
रीना रॉय आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याची तयारी करत आहेत. रीना आजकाल अनेक स्क्रिप्ट्स वाचत आहे. रीना यांना स्त्री-केंद्रित चित्रपटातून पुनरागमन करण्याची इच्छा आहे.लवकरच त्या यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.