मुंबई - बॉ़लीवू़डची अभिनेत्री समीरा रेड्डी रेड्डी (Sameera Reddy) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी तिला कोरोना झाला होता. केवळ ती नाही तर तिच्या घरातील सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. तेव्हा समीरानं त्यांची काळजी घेतली. समीरा म्हणते, कोरोनाचा आपल्याला आलेला अनुभव मोठा वाईट होता. त्याला सामना करताना अनेक गोष्टी नव्यानं समजत गेल्या. आता समीरानं आपल्या चाहत्यांना कोरोनाला सामोरं जाताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हे सांगितले आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. (bollywood actress sameera reddy shared tips to tackle postcovid weakness)
समीराच्या रेड्डी (Sameera Reddy) परिवारातील सदस्यांना कोरोना झाला होता. तिनं आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यातून चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आपण कशाप्रकारे स्वत;ला कोरोनाच्या दरम्यान फिट ठेऊ शकतो हे तिनं सांगितले आहे. त्याला तिच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. तिच्या कुटूंबातील सदस्य आता कोरोनातून बाहेर येत आहे. त्यांचा रिकव्हरी रेट उत्तम असल्याचे तिनं सांगितले आहे. समीरा त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, पोस्ट कोविडनंतर विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्याला अशक्तपणा आलेला असतो. त्यावेळी नारळाचे पाणी, खजूर, काला जामुन, रात्रभर भिजत ठेवलेले बदाम, लिंबाचा रस यांचे सेवन करणे गरजेचे आहे.
आपल्या आहारात जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे. भरपूर झोप घ्यावी. १५ मिनिटांपर्यत वाफ घ्यावी. याशिवाय प्राणायाम, शवासन आणि दीर्घ श्वासाचे व्यायाम करणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. समीरा रेड्डी (Sameera Reddy) पुढे म्हणते, कोरोनाच्या दरम्यान आपली मानसिक स्थिती व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. कोरोनातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे संयम ठेवुन औषधोपचार घ्यावेत.
2014 मध्ये समीरानं रेड्डी (Sameera Reddy) बिझनेसमन अक्षय वर्दे याच्यासोबत लग्न केलं. तिनं टॅक्सी नं 9211. मैने दिल तुझको दिया, रेस आणि दे दना दन सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय़ केला आहे. तिनं हिंदी बरोबरच तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.