मुंबई - बॉलीवूडमध्ये कोरोनाचे कहर वाढताना दिसत आहे. एकापाठोपाठ एक सेलिब्रेटी कोरोना पॉझिटिव्ह होत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता राव या एका पार्टीमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्या पार्टीमध्ये कोरोनाचे सर्व नियम धाब्य़ावर बसवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नेटीझन्सकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान मुंबई महानगर पालिकेनं करिना सहित जे तिच्या संपर्कात आले होते त्यांचे घर सील केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
आता हाती आलेल्या माहितीनुसार, अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा खान, संजय कपूरची पत्नी महिप कपूर यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे चारजण सध्या वेगवेगळ्या ठिकाणी क्वॉरनटाईन करण्यात आले आहे. यावेळी बीएमसीनं आणखी एक अपडेट दिलं आहे. त्यांनी सोहेल खानची पत्नी सीमा खान तिचा दहा वर्षांचा मुलगा योहान खान (Yohaan Khan Corona Positive) हे कोरोनाबाधित झाल्याचे सांगितलं आहे. बीएमसीनं (BMC Sealed Seema Khan Building) सीमा खान राहत असलेली इमारत सील केल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. यापूर्वी बीएमसीनं करिना कपूर आणि करण जोहर राहत असलेल्या इमारती सील आणि सॅनिटाईझ करुन घेतल्या आहेत.
करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) अमृता अरोरा सहित आणखी काही सेलिब्रेटींना ८ डिसेंबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते. हे सर्वजण करण जोहरनं आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्या पार्टीनंतर जेव्हा करिना आणि अमृताची चाचणी करण्यात आली तेव्हा त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. महिप कपूर (Maheep Kapoor Corona Positive)या देखील करण जोहरच्या त्या पार्टीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.