शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

बॉलीवूडची प्रख्य़ात अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (shilpa shetty) पतीला राज कुंद्राला (businessman Raj Kundra ) मुंबई पोलिसांनी पॉर्नोग्राफी (Pornography case) प्रकरणात अटक केली होती.
raj shilpa
raj shilpaesakal
Updated on

मुंबई - बॉलीवूडची प्रख्य़ात अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (shilpa shetty) पतीला राज कुंद्राला (businessman Raj Kundra ) मुंबई पोलिसांनी पॉर्नोग्राफी (Pornography case) प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यावरुन शिल्पाला ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर तीनवेळा त्याचा जामीनही फेटाळण्यात आला होता. त्याला जामीन मिळाल्यानंतर शिल्पानं राजवर टीका करणाऱ्यांकडे लक्ष वेधले होते. कोर्टामध्ये तिनं काही माध्यमांच्या विरोधातही धाव घेतली होती. आता राजला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिल्याची माहिती पुढे आली आहे. (Raj Kundra, Pornography Case)

राजला सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच यापूर्वी राजचा खटल्या ज्या कोर्टामध्ये सुरु होता त्यांच्याकड़ून याप्रकरणाच्या तपासाविषयी पूर्ण अहवालही मागवला आहे. एका अॅपच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला होता. याप्रकऱणी बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा, पुनम पांडे यांनी पोलिसांकडे आपल्याला धमकी दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी राजला अटक करुन त्याच्याकडे चौकशी सुरु केली. त्याच्याकडून काही वस्तुही जप्त करण्यात आल्या होत्या. यापूर्वी राजनं सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तीन वेळा कोर्टानं तो फेटाळला.

raj shilpa
शिल्पा शेट्टीमुळे 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवर पुन्हा रंगला वाद...
raj shilpa
राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीकडून पुण्यात गुंतवणुकीचं आमिष; गुन्हा दाखल

मुंबई उच्च न्यायालयानं देखील 25 नोव्हेंबरला त्याच्या जामीनाची याचिका फेटाळून लावली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्याच्या अटकपूर्व जामीनाचा अर्ज स्विकारत त्याला अटकेपासून संरक्षण दिले आहे. यासगळ्या प्रकऱणात राज आणि शिल्पा यांच्या नात्यामध्ये कटूता आली असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ते घटस्फोट घेणार की काय अशाही अफवा पसरल्या होत्या. मात्र आता त्या चर्चेला शिल्पानं पूर्णविराम दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.