मुंबई - चर्चेत राहणं हे अभिनेत्री स्वरा भास्करला (bollywood actress swara bhaskar) जमलं आहे. ती वेगवेगळ्या कारणानं सोशल मीडियावर चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आपली प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अभिनेत्री स्वरानं केला आहे. आपल्या परखड स्वभाव आणि वादविवादासाठी स्वरा ओळखली जाते. तिच्या एका चित्रपटातील प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल करुन त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया वाचायला मिळत आहे. बदनामी करणाऱ्या सोशल मीडियांच्याविरोधात स्वरानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. तिनं त्याविरोधात पोलिसांकड़े धाव घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वरानं सांगितलं की, ठोस भूमिका मांडल्यानंतर आपल्याला वेळोवेळी टार्गेट करण्यात आले आहे. त्याचा परिणाम होतो. मला नेहमी या ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय. सोशल मीडियावर स्वराच्या विरोधात चालणारे हॅशटॅग यामुळे स्वराला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास झाला आहे. यामुळे तिनं एका युट्युब इन्फ्ल्युंसर आणि व्टिटरच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दिल्लीतील वसंत कुंजमधील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखल घेऊन आयपीसी अॅक्टच्या कलम 354 डी, 509 आणि आयटी अॅक्टच्या कलम 67 नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, तपास सुरु केला आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वरानं सांगितलं होतं की, ऑनलाईन हेटर्स हीच आता माझी ओळख होत चालली आहे. आता मी त्यांच्याविरोधात मोहिम हाती घेण्याचा विचार केला आहे. त्यासाठी मी एक अभियान सुरु केलं आहे. मला माहिती आहे की, माझ्याविरोधात नाराजी पसरवली जात आहे. ऑनलाईन हेटर्सकडून ज्यापद्धतीनं ट्रोल केलं जातं त्यामुळे माझ्या आई वडिलांना त्रास होत असल्याचेही स्वरानं सांगितलं आहे. काही लोकांना वाटतं मी शांत बसावं पण का, मी त्यांना घाबरावं पण का, हा माझा प्रश्न आहे. मी काही बोललं की मला ट्रोल केलं जातं. शिव्या दिल्या जातात. मला याचा काहीही फरक पडत नाही पण माझ्या कुटूंबियांना याचा प्रचंड मानसिक त्रास होत असल्यानं त्यांच्याविरोधात कारवाई पोलिसांनी करावी. म्हणून मी पोलिसांना विनंती केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.