Swara Bhaskar on Israel Palestine Conflict: इस्त्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेले युद्ध आणखीच वाईट होतांना दिसत आहे. इस्राइलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर पॅलेस्टाईन-इस्त्राइल भागातील परिस्थीती खुपच वाईट झाली आहे. आत्तापर्यंत इस्त्राइलमध्ये किमान 600 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1590 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
या युद्धात आता अमेरिकेपासून भारतापर्यत अनेक देशांनी इस्त्राईलला आपला पाठींबा दर्शवला आहे. आता सगळ्या जगाचे लक्ष याकडे लागले आहे. तर अनेक कलाकारांनी यावर भाष्य केले आहे. अनेक नेटकऱ्यांच्या यावर प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. आता त्यातच बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे
स्वराने आपल्या स्टोरीवर लिहिलं की, जेव्हा इस्त्राइलने पॅलेस्टाईनवर हल्ला केला, जेव्हा इस्त्राइलने पॅलेस्टिनी लोकांची घरं उद्ध्वस्त केली, ती काबीज केली. पॅलेस्टाईनची मुले आणि किशोरवयीन मुलींना देखील नाही सोडलं. जवळपास 10 वर्षे सतत गाझावर हल्ले आणि बॉम्बस्फोट केले, तेव्हा तुम्हाला धक्का बसला नसेल. म्हणून मला इस्रायलवरील हल्ल्याबद्दल शोक करणारे लोक ढोंगी वाटतात. इतकेच नाही तर स्वराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर अनेक लोकांच्या पोस्टही शेअर केल्या आहेत.
आता सध्या स्वराची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी तिचे समर्थन करत आहेत तर काहींनी तीला इतिहासाचे दाखले देत ट्रोल केलं आहे.
या सगळ्या दरम्यान काल दिवसभर चर्चेत राहीली ती बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा. नुसरत इस्त्राइल - पॅलेस्टाईन या दोन देशांदरम्यान सुरू असलेल्या युद्धात अडकली होती.
'हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सहभागी होण्यासाठी नुसरत गेली मात्र तिथेच अटकली त्यानंतर तिला भारतीय दूतावासाच्या मदतीने इस्राइलहून भारतात सुखरूप आणण्यात आले. सध्या सोशल मीडियावर तिचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.