'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir FIles) सिनेमाची प्रदर्शना पूर्वीपासून सुरू झालेली वादातीत चर्चा अद्याप सुरूच आहे. एकीकडे प्रशंसा करून सिनेमा डोक्यावर घेणारा चाहतावर्ग दिसतोय तर दुसरीकडे वादाची री ओढून सिनेमाविरोधात बोलणारेही काही कमी नाहीत. आतापर्यंत सर्वच स्तरातून सिनेमावर प्रतिक्रिया आलेल्या आहेत. पहिल्यांदा सिनेमावर भाष्य करण्यासाठी बोलायला मागे-पुढे करणारे बॉलीवूडकरही आपल्या सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत. त्यात आता तापसी पन्नूही सामिल झालीय. तिची प्रतिक्रिया ऐकून मात्र थोडं थक्क व्हायला झालंय. कारण ती असं कही बोलेल याची अपेक्षा नक्कीच अनेकांना नव्हती. काय म्हणालीय तापसी पन्नू 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाविषयी?
'द काश्मिर फाईल्स' सिनेमाविषयी बोलताना तापसी म्हणाली, ''सिनेमा छोट्या बजेटमध्ये बनलाय किंवा सिनेमातल्या सत्य घटना, त्यावरुन रंगलेले वाद ही सिनेमाच्या यशाची कारणं समजली जात असतील कदाचित. पण मी फक्त बॉक्सऑफिसवरच्या कलेक्शनच्या आकड्यांना महत्त्व देते. बाकीच्या गोष्टी त्या यशाला किती कारणीभूत ठरल्या याचा मी विचार करीत नाही. सिनेमानं बॉक्सऑफिसवर कमाई केलीय,मग तो यशस्वी झाला बस्स् माझ्यासाठी हेच महत्त्वाचं. कोणत्याही सिनेमाला कधीही १०० टक्के पसंती मिळत नाही. आणि इतकी कमाई केलेल्या सिनेमाला वाईट कसं म्हणायचं?''. अनेक अर्थपूर्ण सिनेमात काम करणाऱ्या तापसीकडनं अशा व्यावहारिक प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. कारण सिनेमातील सत्य घटना पाहून अनेकजण भावूक होताना पाहिलेयत सगळ्यांनी. मग त्यात सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींचाही समावेश होता. त्यामुळे तापसीकडनं देखील अशाच भावनिक प्रतिक्रियेची अपेक्षा होती. ती इतकं व्यवहारिक बोलेल असं वाटलं नव्हतं.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स' सिनेमा म्हणे फक्त १५ करोडमध्ये बनलाय. आणि आज या सिनेमानं तब्बल २०० करोड कमाई केल्याचं बोललं जात आहे. या सिनेमात अनुपम खेर,मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,चिन्मय मांडलेकर,दर्शन कुमार,मृणाल कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी उत्तम काम केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.