Tv Entertainment news: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आता राजकीय, धार्मिक, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी होताना दिसत आहेत. त्यामध्ये बाबा रामदेव यांचेही नाव घ्यावे लागेल. बाबा रामदेव हे टीव्ही मनोरंजन (Social media news) वाहिन्यांवरील बहुतांशी रियॅलिटी शो मध्ये सहभागी झाले आहेत. त्यांची उपस्थिती नेटकऱ्यांचे मनोरंजन करते. त्यांच्या प्रतिक्रिया, एखाद्या स्पर्धकांवर त्यांनी केलेली टिप्पणी ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असल्याचे (Bollywood Actors) दिसून आले आहे. यापूर्वी देखील डान्स इंडिया डान्स, सुपरस्टार डान्सर सारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीवर केलेली कमेंट बराच काळ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय होती.
आता बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री जीनत अमान (Zeenat Aman) ज्यांनी 70 ते 80 च्या दशकांत आपल्या सौंदर्य आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले अशा जीनत अमान यांनी रामदेव बाबा (Baba Ramdev) यांच्याकडे एक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर जीनत अमान यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस् देण्यास सुरुवात तेली आहे. जीनत अमान यांनी जेव्हा आपण बॉलीवूडमध्ये एक अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात केली तेव्हा ज्या प्रसंगांचा सामना करावा लागला त्याविषयी सांगितले आहे.
सुपरस्टार सिंगर या रियॅलिटी शो च्या दुसऱ्या पर्वामध्ये जीनत अमान या सहभागी झाल्या होत्या. त्यात पाहुणे सेलिब्रेटी म्हणून योगगुरु रामदेव बाबांही सहभागी झाले होते. त्यावेळी जीनत अमान यांनी आपल्याला कॅमेऱ्यासमोर जाताना जी भीती वाटत होती ती प्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांनी कशाप्रकारे दूर केली याचा खुलासा बाबा रामदेव यांच्यासमोर केला आहे. बॉलीवूडमध्ये एक नवीन अभिनेत्री म्हणून प्रवेश केला. मात्र मनात खूप भीती होती. खासकरुन जेव्हा एखाद्या सीनचे चित्रिकरण सुरु व्हायचे तेव्हा कॅमेऱ्यासमोर परफॉर्म करताना भीती वाटायची. अशावेळी देव आनंद यांनी कॅमेऱ्याची भीती खूप सहजपणे घालवली. याची आठवण जीनत यांनी यावेळी सांगितली.
देव आनंद आणि मी एका चित्रपटाच्या निमित्तानं काठमांडूमध्ये होतो. देव आनंद यांची भूमिका करण्याची वेगळी शैली होती. ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जे जेव्हा सेटवर यायचे तेव्हा वातावरण प्रसन्न असायचे. आपल्या सोबतच्या कलाकारांना देव आनंद हे नेहमीच प्रोत्साहन देत असे. मलाही त्यांनी खूप मार्गदर्शन केले. माझ्या मनातील कॅमेऱ्याविषयीची जी भीती होती. ती त्यांनी घालवली. असे जीनत यांनी यावेळी बाबा रामदेव यांना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.