Aishwarya Rai: एकदा सेलिब्रिटी म्हणून ओळख झाली की त्याची किंमतही अनेकदा मोजावी लागते याचा प्रत्यय नुकताच ऐश्वर्या राय-बच्चनला आला आहे. सेलिब्रिटींच्या नावाचा व फोटोचा वापर फसवणूक आणि घोटाळे करण्यासाठी अनेकदा केला गेलेला उघडकीस आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी एका निवृत्त लष्करी कर्नलसोबत घोटाळा केल्याप्रकरणात तीन परदेशी नागरिकांना अटक केली, पण त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे की त्या गुन्हेगारांकडे ऐश्वर्या राय बच्चनचा बनावट पासपोर्ट देखील पोलिसांना सापडला आहे.(Bollywood: Aishwarya Rai Bachchan’s FAKE Passport ,Three Arrested)
झालं असं की सध्या आनलॉईन फसवणूकीचा धोका वाढला आहे. रोज आनलॉईन फसवणूकीच्या बातम्या येतात. उत्तर प्रदेश पोलिसांनी एका निवृत्त लष्करी कर्नल सोबत घोटाळा केल्याप्रकरणी तीन परदेशी नागरिकांना अटक केली . या चोरांनी कर्नलला १.८१ कोटी रुपयांचा गंडा लावला . त्या संदर्भात कर्नलनी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. यूपी पोलिसांच्या सायबर क्राईम टीमने याचा तपास सुरु केला आणि त्यात तीन परदेशी नागरिक असलेल्या चोरांना ताब्यात घेतलं. त्यापैकी दोन नायजेरियाचे आणि एक घानाचा नागरिक आहे.
ग्रेटर नोएडाचे पोलिस उपायुक्त अभिषेक वर्मा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अटके दरम्यान पोलिसांना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचाही बनावट पासपोर्ट आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पासपोर्टवर तिचा फोटो होता. त्याशिवाय त्यांच्या ताब्यात USD 3,000 आणि 10,500 पौंड सापडले. त्यांच्याकडून 10.76 कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन तसेच बनावट ब्रिटिश पाउंड आणि अमेरिकन डॉलर्सचे डझनभर बंडलही जप्त करण्यात आले आहेत. वर्मा यांनी उघड केले की 11 सिमकार्ड, 6 मोबाईल फोन, लॅपटॉप, प्रिंटर आणि बनावट चलन छापण्यासाठी तिघांनी वापरलेली उपकरणे देखील पोलिसांनी जप्त केली आहेत.
मध्यंतरी कर्नाटक राज्यात शिक्षक भरती परीक्षांमध्ये असा प्रकार घडला होता. एका विद्यार्थ्याच्या ओळखपत्रावर सनी लिओनीचा आक्षेपार्ह फोटो लावण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.