Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरनं हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. भूमीनं अनेक सिनेमांमधून दमदार व्यक्तिरेखा साकारत आपला असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ती आपल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला पूर्ण आत्मविश्वासानं पडद्यावर साकारताना दिसते. पण 'लस्ट स्टोरी' सिनेमात इंटिमेट सीन्स करताना भूमी खूपच नर्व्हस होती. आता नुकत्याच एका मुलाखतीत भूमीनं आपल्या भूमिकेविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. (Bhumi Pednekar says she was nervous while doing intimate scene in lust stories)
'लस्ट स्टोरीज' २०१८ मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. यामध्ये वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या होत्या. त्यातील भूमीच्या कथेचं दिग्दर्शन झोया अख्तरनं केलं होतं. भूमीनं या कथेत घरच्या मोलकरणीची भूमिका केली होती. आणि तिला कथेत दाखवण्यात आलेला आपला मालक नील भूपालम सोबत इंटीमेट सीन्स द्यायचे होते.
भूमीला ते इंटिमेट सीन्स देताना खूप अस्वस्थ वाटत होतं. ती ते सीन देताना सहज नव्हती. याविषयी बोलताना भूमी म्हणाली,''मी जेव्हा लस्ट स्टोरी सिनेमा केला तेव्हा खूप नर्व्हस होती कारण इंटीमेट सीन्स शूट होणार होते आणि त्यावेळी टाइम इंटिमेसी कोऑर्डिनेटर नसायचे''.
भूमी म्हणाली की,''इंटीमेट सीन्स करण्यासाठी झोया अख्तरनं तिला खूप सहकार्य केलं. झोया मला आणि नीलला आपल्यासोबत बाजूला घेऊन गेली आणि तिनं समजावलं की कोणत्या वेळी कसं फील करायचं...तु एक मुलगी आहेस आणि तुझ्या को-अॅक्टरला शॉट देताना तुझ्या भावनांची गरज लागेल तरच तो त्याचा सीन नीट करू शकेल''.
भूमी पुढे म्हणाली-''मी या कारणानं देखील जास्त नर्व्हस होती,कारण त्यावेळी माझ्या अंगावर कपडे खूप कमी होते. आणि खूप लोक आजुबाजूला असताना तो सीन मला द्यायचा होता. माझ्या अंगावर मुश्किलिनं दोन कपडे होते''.
लस्ट स्टोरी विषयी सांगायचं झालं या सिनेमात चार वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या होत्या. ज्यांना करण जोहर,अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जीनं दिग्दर्शित केलं होतं.
भूमी पेडणेकर विषयी बोलायचं झालं तर तिला आपण नुकतंच 'गोविंदा नाम मेरा' सिनेमात पाहिलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत विकी कौशल आणि कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेत होते.
भूमी आता नव्या वर्षात अनेक सिनेमांमधून आपल्या भेटीस येणार आहे. 'भीड',' द लेडी किलर', 'अफवाह' सिनेमातही ती दिसणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.