Movies: आजचा दिवस मोठा, आनंदाला नाही तोटा! 25 चित्रपट होणार प्रदर्शित

मनोरंजन क्षेत्राला दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे जी मरगळ आली होती. बऱ्याचशा चित्रपटांच्या प्रदर्शनावर मर्यादा आल्या होत्या त्यांचा मार्ग आता सुकर झाला आहे.
Marathi movie released news
Marathi movie released news esakal
Updated on

Bollywood Movies: मनोरंजन क्षेत्राला दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे जी मरगळ आली होती. बऱ्याचशा चित्रपटांच्या प्रदर्शनावर मर्यादा आल्या होत्या त्यांचा मार्ग आता सुकर झाला आहे. कोरोनाचा मोठा फटका (entertainment news) मनोरंजन क्षेत्राला बसला होता यावर्षीपासून मोठ्या प्रमाणावर बॉलीवूड, टॉलीवूड, मॉलीवूड तसेच वेगवेगळ्या (Tollywood news) प्रादेशिक भाषांमधील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आजच्या दिवशी तर तब्बल 25 चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहीती आहे. यामध्ये मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती, तमिळ, इंग्रजी भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट कोणते आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

* हिंदी भाषेत प्रदर्शित कोणते चित्रपट प्रदर्शित होणार आहेत?

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा निक्कमा आज प्रदर्शित होतो आहे. त्यात भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी, शर्ली सेतिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. इत्तु सी बात हा सामाजिक विषयावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याची निर्मिती लक्ष्मण उत्तेकर यांनी केली असून दिग्दर्शन अदनान अली यांनी केली आहे.

लाईट इयर हा इंग्रजी भाषेतील चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात ख्रिस इवान्स, पीटर सोहन यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचे दिग्दर्शन अँग मॅकलेन यांनी केले आहे. तेलुगू भाषेतील विराटा परवम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यात साई पल्लवी, राणा दुग्गुबाती यांच्या भूमिका आहेत. त्याचे दिग्दर्शन वेणु उरुग्वे यांनी केले आहे. याशिवाय गोडसे नावाचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. जो कन्नड भाषेतील आहे. त्यात ऐश्वर्या लक्ष्मी, सत्यदेव कंचराना यांच्या भूमिका आहेत.

tollywood movies
tollywood moviesesakal

याबरोबरच केरोसीन, यु आर माय हिरो, वीता विशेषम, वाशी, हेवेन आणि विद्दीकालुदे मधु, प्रकाशन परक्कटे हे प्रादेशिक भाषेतील चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. प्रकाशन परक्कटे या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहद यांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. अखेर तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

* मराठी चित्रपट - मराठीतील चार चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामध्ये भिरकीट आणि आठवा रंग प्रेमाचा, मीडियम स्पायसी, ये रे पाऊसा या चित्रपटांचा समावेश आहे. भिरकीटमध्ये अभिनेते गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचे दिग्दर्शन अशोक जगदाळे यांनी केले आहे. आठवा रंग प्रेमाचा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात विशाल आनंद, रिंकु राजगुरु यांच्या भूमिका आहेत.

Friday movie news
Friday movie news esakal
Marathi movie released news
Flop Movies: टॉलीवूडपुढे टाकली मान! या वर्षातील बॉलीवूडचे 10 फ्लॉप चित्रपट

याबरोबरच बांग्ला भाषेतील इस्काबोन, आय खुकू आय, पोस्टी, चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. गुजराती भाषेतील नाडी दोषही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय लव यु पापा, परिचय या चित्रपटांची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे.

Marathi movie released news
Movie Review: 'फनरल'- 'आनंदी जीवनाचा जगण्याचा नवा मंत्र' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.