Happy Birthday Kajol: वडिलांच्या मनाविरूद्ध गेली अन्..., अशी आहे 'काजोल-अजय'ची प्यारवाली लव्हस्टोरी!

काजोल आणि शाहरुख यांची जोडी इतकी लोकप्रिय होती की लोकांना ते खरे कपल असल्याचं वाटायचं. मात्र काजोल प्रेमात पडली ते बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या. त्यांची प्रेमकहानीही खूप रंजक आहे.
Happy Birthday Kajol:
Happy Birthday Kajol: Esakal
Updated on

Kajol Birthday: मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे काजोल. तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

तिची आणि शाहरुख खानची जोडी तर आजही चाहत्यांना तितकिच आवडते. त्याचा ऑन-स्क्रीन रोमान्स प्रेक्षकांना खुप आवडतो. आज काजोल तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील काही रंजग गोष्टी जाणुन घेवुया...

(Kajol's Birthday) 

अभिनयाची सुरुवात

काजोलला बालपणापासूनच अभिनय खुप आवड होती. तिने शाळेपासूनच अभिनय करायला सुरुवात केली. ती 16 वर्षांची असतांना तिने 'बेखुदी' चित्रपट साइन केला होता. या चित्रपटातुन तिला खुप प्रशंसादेखील मिळाली होती.पण 'बाजीगर'चित्रपटाच्या यशानंतर काजोलने अभिनयासाठी शाळा सोडली.

Happy Birthday Kajol:
Sruthi Shanmuga Priya: लग्नाला एक वर्षही झालं नाही तोच प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीवर काळाचा घाला

काजोल बनली होती खलनायक

काजोल आणि शाहरुख खानची जोडी आजही तितकिच लोकप्रिय आहे. दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. ज्यात 'खुशी कभी गम', 'कुछ कुछ होता है'. ', 'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आणि 'दिलवाले' हे चित्रपट आहेत. केवळ हिरोइन म्हणुनच नव्हे तर तिने बॉबी देओल आणि मनीषा कोईराला यांच्या विरुद्ध 'गुप्त' चित्रपटातील व्हिलनची भुमिकादेखील खुप उत्तमरित्या साकारली होती.

Happy Birthday Kajol:
Nitin Desai: नितीन देसाईच्या अंत्यसंस्काराला बॉलीवूड तारके का आले नाहीत ? आमिर खानने स्पष्ट सांगितलं

काजोलची प्यारवाली लव्हस्टोरी..

काजोल आणि शाहरुख यांची जोडी इतकी लोकप्रिय होती की लोकांना ते खरे कपल असल्याचं वाटायचं. मात्र काजोल प्रेमात पडली ते बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या. त्यांची प्रेमकहानीही खूप रंजक आहे. अजय देवगणसोबत तिची पहिली भेट 'हलचल' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. अजय देवगणचा चेहरा पाहून ती त्याच्यावर रागावली.

Happy Birthday Kajol:
Nitin Chandrakant Desai Funeral : बॉलीवूडचा 'विश्वकर्मा' अनंतात विलीन! नितीन देसाई यांना अखेरचा निरोप

अजय सेट फारसा कुणाशी बोलत नव्हता. मुळात अजयचा स्वभावच अबोल असल्याने काजोल वाटायचे की तो कुणाशीच बोलत नसावा मात्र नंतर दोघांमध्ये छान मैत्री झाली. त्यावेळी काजोल आणि अजय दोघे दुस-यांसोबत रिलेशनमध्ये होते. नंतर दोघांमध्ये मैत्री झाली अन् ते मित्रांप्रमाणे एकत्र वेळ घालवत होते.

दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले ज्यात 'इश्क', 'प्यार तो होना ही था', 'दिल क्या करे', 'राजू चाचा' आणि 'यू मी और हम' असे चित्रपट होते. दोघांची जवळिक वाढली आणि नंतर दोघांच्या मैत्रीचं रुपातंर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

मात्र काजोलच्या परिवाराला तो मान्य नव्हता. तिच्या वडिलांची मुळिच इच्छा नव्हती की तिने त्या वयात लग्न करावं. तिची आई तनुजाचा लेकीला पाठिंबा होता. अशा परिस्थितीत चार दिवस ते काजोलशी बोलले नाही, पण काजोलला अजयशी लग्न करायचे होते. तनुजा आणि अजय देवगणच्या आई-वडिलांनी आधीच सहमती दर्शवली होती आणि एका छोट्याशा समारंभात दोघांनी लग्न केले.

शेवटी काजोलनं त्यांच्याकडूनही होकार घेतला अन् त्यानंतर 24 फेब्रुवारी 1999 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांना न्यासाही मुलगी आणि युग हा मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.