Bollywood: अभिनेत्री सारिका आणि नीना गुप्ता या दोघीही अभिनेत्री नुकत्याच आपल्याला 'ऊंचाई' सिनेमातून एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसल्या. या सिनेमाच्या निमित्तानं झालेल्या एका मुलाखतीत सारिका यांना विचारलं गेलं होतं की नीना गुप्ता यांनी पुन्हा जोमानं इंडस्ट्रीत काम सुरु केल्यामुळे इंडस्ट्रीतील इतर ज्येष्ठ कलाकारांना पुन्हा बॉलीवूडचे दरवाजे खुले झालेयत का?
यावर सारिका स्पष्टच म्हणाल्या की,''हा नीना चा काम मिळवण्यासाठीचा स्वतंत्र लढा होता. यामुळे कोणा दुसऱ्या कलाकाराला यामुळे संधी उपलब्ध झाली असं म्हणता येणार नाही''.(Bollywood: Neena Gupta Work Plea opened doors for other actresses..sarika said,this was her indivisual story)
नीना गुप्ता यांनी २०१७ मध्ये आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्याला अभिनयाची संधी द्यावी अशी जाहीर विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी आपला एक फोटो शेअर करत लिहिलं होतं की,''मी मुंबईत राहते आणि चांगला अभिनय मला येतो,आणि त्यासाठी मला चांगल्या भूमिकांची प्रतिक्षा आहे''. नीना गुप्ता यांच्या या पोस्टनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती.
नुकत्याच एका मुलाखतीत सारिका म्हणाल्या आहेत की, ''मला वाटते नीनाचं काम मिळवण्यासाठीचा तो स्वतंत्र लढा होता पण त्यामुळे इतर कलाकारांना काम मिळालं असं म्हणता येणार नाही. ती तिची स्वतंत्र कहाणी आहे की तिला इतकं काम मिळायला सुरुवात झाली,जी खरंच हैराण करणारी गोष्ट आहे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की तिनं इतकी फेमस अभिनेत्री असताना देखील स्वतःहून पुढे येऊन काम मागितलं. आणि त्यानंतर खरंतर ती मुळतः चांगली अभिनेत्री असल्यानं तिला काम मिळायला सुरुवात झाली. पण यामुळे मला नाही वाटत की इतर कलाकारांना काम मिळायला लागलं. त्यामुळे कोणाला जर वाटत असेल की नीनानं पुढाकार घेतल्यामुळे इतर अभिनेत्रींना काम मिळालं तर ते चुकीचं ठरेल.''
सारिका पुढे म्हणाल्या,''मला वाटतं की शेफाली शहा देखील खूप चांगलं काम करते. खूप अशा चांगल्या अभिनेत्री आहेत ज्या काम करतायत. मला शीबाचं काम देखील आवडतं. आम्ही 'परजानिया' मध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे मला वाटतं की नीना गुप्ता यांच्यामुळे या सगळ्या इतर अभिनेत्रींसाठी अभिनयाचे दरवाजे ओपन झाले असं नक्कीच म्हणता येणार नाही. ज्यानं त्यानं आपल्या मेहनतीने ते मिळवलं. आणि नीना गुप्ता यांच्या बाबतीत म्हणायचं तर त्यांनी थेट आवाज केला यामुळे ते खरंच प्रशंसा करण्यासारखंच आहे''.
सारिका यांनी १९६० च्या दशकात 'मझली दीदी' आणि 'हमराज' या सिनेमातून बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या. तर 'गीत गाता चल', 'मधु मालती','जान ए बहार','जानी दुश्मन' सारख्या सिनेमातून मुख्य भूमिका साकारल्या होत्या. सुरज बडजात्याच्या 'ऊंचाई' सिनेमातही त्या दिसल्या होत्या,या सिनेमात नीना गुप्ता देखील होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.