Amitabh Bachchan यांनी विकलं 'सोपान'; 23 कोटींना झाला सौदा!

Amitabh Bachchan
Amitabh Bachchanesakal
Updated on
Summary

गुलमोहर पार्कमध्ये असलेली ही दुमजली इमारत अमिताभ बच्चन यांचं पहिलं घर असल्याचं सांगितलं जातंय.

नवी दिल्ली : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी दक्षिण दिल्लीतील गुलमोहल पार्कमध्ये असलेलं त्यांचं 'सोपान' घर (Sopaan Home) विकलं आहे. या करारातून त्यांना कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. हे घर त्यांनी जवळपास 23 कोटींना विकल्याचं सांगितलं जातंय. या घरात अमिताभ यांची आई तेजी बच्चन आणि वडील हरिवंशराय बच्चन राहत होते.

ही मालमत्ता Nezone ग्रुपच्या सीईओ अवनी बदेर (Avni Bader) यांनी विकत घेतलीय. ते बच्चन कुटुंबाला गेल्या 35 वर्षांपासून ओळखतात आणि त्याच परिसरात राहतात. इकॉनॉमिक टाईम्सच्या (Economic Times) मते, 418 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या या मालमत्तेची नोंदणी गेल्या वर्षी 7 डिसेंबर रोजी झाली होती. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या आई तेजी बच्चन (Teji Bachchan) यांच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या 'सोपान' या घराचा उल्लेख केलाय. इकॉनॉमिक टाईम्सशी झालेल्या संवादात अवनीनं सांगितलं की, हे जुनं बांधकाम आहे, जे आम्ही आमच्या गरजेनुसार पाडून पुन्हा तयार करू. आम्ही या भागात अनेक वर्षांपासून राहत आहोत आणि आम्ही खूप दिवसांपासून नवीन जागा शोधत होतो आणि जेव्हा आम्हाला ही ऑफर मिळाली, तेव्हा आम्ही लगेच हो म्हटलं, असं ते म्हणाले.

Amitabh Bachchan
शेतकरी 30 मिनिटांत 10 लाखांची रोकड घेऊन पोहोचला Mahindra Showroom मध्ये

गुलमोहर पार्कमध्ये (Gulmohar Park) असलेली ही दुमजली इमारत अमिताभ बच्चन यांचं पहिलं घर असल्याचं सांगितलं जातंय. रिपोर्ट्सनुसार, मुंबईत शिफ्ट होण्यापूर्वी अमिताभ बच्चन आपल्या आई-वडिलांसोबत या घरात राहत होते. काही काळानंतर अमिताभचे आई-वडिलही मुंबईत शिफ्ट झाले, त्यामुळं अनेक वर्षांपासून हे घर रिकामेच होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()