Pathan: सध्या देशभरात शाहरुख खान,दीपिका पदूकोण जोरदार चर्चेत आहेत. अर्थात त्यांच्या सिनेमातील 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिकाची भगवी बिकिनी सगळ्यांना खटकली आहे आणि यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या विरोधकांना आता TMC संसद आणि अभिनेत्री हॉट नुसरत जहानं कडक उत्तर दिलं आहे. तिनं म्हटलं आहे की कोणत्याही राजकीय पक्षाजवळ रंगाचे कोणतेही अधिकृत लायसन्स नाही.(Bollywood: Nusrat Jahan reacted on pathaan besharam song controversy)
एका टी.व्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नुसरत जहांने म्हटलं आहे की,''त्या लोकांना सगळ्या गोष्टींची अडचण आहे. त्यांना महिलांच्या हिजाब न घालण्यावरनं अडचण आहे, त्यांना महिलांच्या बिकिनी घालण्यावर आक्षेप आहे. हे लोक भारताच्या आजच्या काळातील महिलांना सांगणार की त्यांनी काय घातलं पाहिजे. नुसरत म्हणाली,सत्ताधारी पक्षाचे नेते आता आमचं आयुष्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत''.
टटआम्ही काय घातलं पाहिजे, काय खाल्ल पाहिजे,कसं बोललं पाहिजे,कसं चाललं पाहिजे,शाळेत काय शिकायला हवं,टी.व्ही वर काय पहायला हवं..आम्ही या तथाकथित विकसित भारतात पूर्णपणे पारतंत्र्यात वावरल्यासारखं दुसऱ्याच कुणाच्यातरी आदेशांवर चालतोय. आणि हे खूपच भीतीदायक चित्र आहे. मला भीती आहे की येणारा काळ आपल्यासाठी फार काही चांगला नसेल. एका भलत्याच मार्गावर नेईल तो आपल्याला''.
'बेशरम रंग' गाण्याला अनेक स्तरावर विरोध होतोय. सु्प्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदल यांनी देखील सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केलीय. अनेक हिंदू धार्मिक संघटनांनी आक्षेप घेत सिनेमावर बंदी आणण्याचं म्हटलंय. अयोध्येच्या महंतांनी तर ज्या थिएटरात 'पठाण' लागेल ते जाळून टाकू अशी धमकी दिलीय. नेहमीप्रमाणे 'शक्तीमान' फेम मुकेश खन्ना यांनी देखील विरोधातच आवाज उठवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.