Paresh Rawal: बॉलीवूडअभिनेता आणि नेता परेश रावल आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. लवकरच होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी सध्या परेश रावल गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले आहेत. यादरम्यान त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे,ज्यामुळे लोक आता थोडे संतापले आहेत.
त्याचं झालं असं की,गुजरातमध्ये परेश रावल आपल्या पार्टीचा म्हणजे भाजपाचा प्रचार करण्यास पोहोचले होते. तिथे रावल यांनी लोकांना संबोधित केले आणि काहीतरी असं बोलून गेले ज्यामुळे लोक मात्र भलतेच भडकले आहेत. आपल्या भाषणात परेश रावल यांनी रोहिंग्या मुसलमानांचा विषय काढला आणि अडचणीत सापडले.(Paresh Rawal Gujrat speech controversy will you cook fish for bengalis slams actor)
गुजरातच्या वलसाड मध्ये परेश रावल यांनी गुजराती भाषेतून लोकांना संबोधित केलं. त्यांनी महागलेल्या गॅस सिलेंडर विषयी आणि रोजगार संधीविषयी सरकारतर्फे स्पष्टिकरण लोकांसमोर देण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान परेश रावल म्हणाले,गॅस सिलेंडर महाग आहे,पण हे स्वस्त होईल. लोकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील. पण काय होईल जेव्हा रोहिंग्या मुसलमान आणि बांग्लादेशी लोक आपल्या आजुबाजूला राहायला येतील. जसं दिल्लीत आता होताना दिसत आहे. तेव्हा गॅस सिलेंडरचं काय कराल? बंगाली लोकांसाठी मासे शिजवाल?
परेश रावलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे अन् यामुळे खळबळ देखील माजली आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांनीही परेश रावल यांच्या या वक्तव्याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. किर्ती आझाद यांनी परेश रावल यांच्यावर हल्लाबोल करणारं ट्वीट करत त्यात लिहिलं आहे,''बाबू भाई तुम्ही तर असे नव्हता..जर बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांनी भारतात घुसखोरी केली तर ओळखून जा आपले गृहमंत्री कुठेतरी कमी पडत आहेत,चांगलं काम करत नाहीत. की तुम्हाला असं बोलायचं आहे की बीएसएफ सीमेच्या सुरक्षितेत आपण कुठेतरी कमी पडतोय?''
तृणमुल कॉंग्रेसचे आयटी प्रमुख देबांगशु भट्टाचार्जी यांनी म्हटलं आहे की,''मोदी हे सत्तेत आले तेच गॅस आणि एलपीजीच्या किंमतींमुळेच. परेश रावल तुम्ही ती गोष्ट विसरलात का? जेव्हा गॅसच्या किमती वाढतात तेव्हा हिंदू-मुसलमान दोघांवर याचा परिणाम होतो. ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या परेश रावल ज्यांनी 'ओह माय गॉ़ड' सारखा सिनेमा केला, ते निवडणुका दरम्यान बोलत आहेत की ते धर्मावरनं होणाऱ्या बिझनेस विरोधात उभे राहिलेत. ते पण गुजरातमधील काही मतांसाठी''.
पुढे भट्टाचार्जी म्हणाले की,''परेश रावल यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की सिनेमे बंगाली भाषेतही रिलीज होतात. परेश रावल यांनी बोलून दाखवलं की, गॅसचे भाव कमी झाले तर तुम्ही बंगाली लोकांसाठी मासे शिजवणार का? आणि आता ते बंगाली लोकांची तुलना गैर पद्धतीनं घुसखोरी करणाऱ्यांशी करत आहेत.
आता कळत आहे की परेश रावल यांनी आपल्या त्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. परेश रावल यांचे म्हणणे आहे की त्यांचा म्हणण्याचा अर्थ तो नव्हता,जो लोक काढताना दिसत आहेत. परेश रावल यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की,''मासे या विषयावरनं वाद उकरुन काढणं हा मुद्दाच नाही. कारण गुजराती देखील मासे खातात. पण इथे मी स्पष्ट करू इच्छितो की बंगाली लोकांविषयी मी बोललो ते घुसखोरी केलेल्या बंगाली आणि रोहिंग्या मुसलमानांविरोधात. पण तरीही जर का आपल्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो''.
पण हा वाद अजूनही थांबलेला नाही. नेटकऱ्यांनी आता परेश रावल यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यातनं आपला रागही व्यक्त केला आहे. या ट्वीटला डिलीट करा असे अनेक नेटकरी परेश रावल यांना सांगताना दिसत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की या ट्वीटमध्ये परेश रावल यांनी चुकीची गोष्ट लिहिली आहे,ज्यावरनं ते माफी मागत आहेत असे मुळीच वाटत नाही. दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी तर परेश रावल यांच्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.