Bollywood: करीना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी आला नवा पाहुणा ...

जोरदार स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ...
Kareena Kapoor
Saif Ali Khan
Kareena Kapoor Saif Ali Khan
Updated on

बॉलिवूडचे पॅावर कपल म्हणुन ओळख असलेल्या अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांची नवाबगिरी सर्वश्रुत आहे. डिझाइनर कपड्यांपासून आलिशान  गाड्यांपर्यंत त्यांच्या लाईफस्टाईलमुळे ते नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या आलिशान गाड्यांमध्ये अजुन एका लग्जरी कारची वाढ झाली आहे.  

या जोडप्याने नुकतीच नवी मर्सिडीज खरेदी केली आहे.ही आलिशान मर्सिडीज् कार पांढऱ्या रंगाची आहे.या व्हिडीओमध्ये करीना आणि सैफ नव्या मर्सिडीजचं स्वागत करत आहेत. यावेळी त्यांचा संपूर्ण स्टाफदेखील  उपस्थित होता. कारच्या स्वागतावेळी करीनाने छोटा मुलगा जेहाला आपल्या कडेवर घेतलेले होते. यानंतर जेह अली खान आपल्या नॅसीसोबत नवीन कारमध्ये बसतो आणि चक्कर मारायला निघातो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या जोरदार व्हायरल होतोय. विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला भरभरुन कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत. करीना आणि सैफचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.

Kareena Kapoor
Saif Ali Khan
Kareena Kapoor Khan : बॉलिवूडच्या बेबोचा साडीतला हटके लूक

काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत. कारण एक दिवस आधीच करीना-सैफने मोठा मुलगा तैमूरसाठी एक जीप खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. या जीपची किंमत जवळजवळ 60 ते 70 लाख असल्याचं म्हटलं जात आहे. इतका पैसा खर्च करण्यापेक्षा गरिबांना दान करण्याचा सल्लाही त्यांना देत आहेत. या दोघांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लग्जरी कार असून त्यात बीएमडब्ल्यू, मस्टान्ग, रेंज रोव्हर, लँड क्रुझर,लेक्सस 470 यांसारख्या आलिशान कार आहेत. यामध्ये आता आणखी एका मर्सिडीजचा समावेश झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.