Bollywood News: बॉलीवूडच्या चाहत्यांसाठी वेदनादायी बातमी म्हणजे गली (Gully Boy Movie) बॉयच्या एका रॅपरचं निधन झालं आहे. एमसी या नावानं (Mc Tod Fod Aka Dhamesh parmar) लोकप्रिय झालेल्या या रॅपरनं वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता रणबीर सिंगनं त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या (Entertainment News) गायकीनं सोशल मीडियावरुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या रॅपरच्या निधनानं चाहत्यांनी धक्का बसला आहे. भवतालच्या सामाजिक परिस्थितीवर आपल्या गाण्यातून प्रभावी मांडणी करणाऱ्या रॅपरमध्ये एमसीचं नाव घ्यावे लागेल. त्याचा चाहतावर्गही मोठा होता. एमसी तोडफोड या नावानं त्याला अमाप लोकप्रियता मिळाली होती.
एमसी उर्फ धर्मेश परमार हा त्याच्या वेगळ्या रॅपर गाण्यासाठी ओळखला जात होता. त्यानं झोया अख्तर दिग्दर्शित गली बॉयमध्ये रणबीर सिंगसोबत काम केले होते. धर्मेशच्या मृत्युचे कारण अद्याप कळलेलं नाही. त्यानं इंडिया 91 या गाण्याचं केलेलं रॅप चाहत्यांना प्रचंड आवडले होते. त्यामुळे त्याच्या वाट्याला मोठी लोकप्रियता आली. मात्र अवघ्या वयाच्या 24 व्या वर्षी त्याचं निधन झाल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय सोशल मीडियावरुनही चाहत्यांनी धर्मेशच्या कुटूंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. रणवीर सिंगनं देखील त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन धर्मेशला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानं यावेळी धर्मेश परमारचा एक फोटोही शेयर केला आहे. e
रणवीरनं तो फोटो धर्मेशला टॅग केला आहे. त्या फोटोखाली एक इमोजीही शेयर केला आहे. एमसी तोड फोड हा मुंबईच्या स्ट्रीट रॅपरपैकी एक होता. त्याची लोकप्रियता मोठी होती. एमसी हा देशातील वेगवेगळ्या रॅपर ग्रुपशी संबंधित होता. त्यानं गेल्या 9 वर्षांपासून रॅपर क्षेत्रामध्ये स्वताचे वेगळे स्थान निर्माण केले होते. सोशल मीडियावर धर्मेशचा मोठा चाहतावर्ग आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.