Cirkus Movie: रणवीर सिंगचा बहुचर्चित 'सर्कस' सिनेमा रिलीज झाला आहे. कॉमेडी आणि मजेदार पंचेसनी भरलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे. रोहित शेट्टीची गणती बॉलीवूडच्या टॉपच्या निर्माता-दिग्दर्शकांमध्ये केली जाते. मोठ्या बजेटचा कौटुंबिक सिनेमा बनवण्यात रोहित शेट्टीचा हातखंडा आहे. सर्कसमध्ये रणवीर सिंगचा डबल रोल आहे. सिनेमात मराठी कलाकारांचा देखील नेहमीप्रमाणे भरणा आहे,तर मातब्बर बॉलीवूडचे कॉमेडियन देखील सिनेमात आहेत. पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. .यामुळे काही शोज कॅन्सल केल्याचं देखील वृत्त आहे. (Bollywood: Rohit shetty Cirkus Movie Online Leak)
यादरम्यान आता बातमी आहे की सिनेमा ऑनलाइन पायरेसीला बळी ठरला आहे. सिनेमागृहात पोहोचता पोहोचताच सिनेमा इंटरनेटवर लीक झाला आहे. सर्कस सिनेमाला व्यवस्थित प्लॅनिंग करुन रोहित शेट्टीनं रिलीज केलं होतं. बिग बॉस १६ सोबतच अनेक प्लॅटफॉर्मवर सिनेमाचं प्रमोशन केलं गेलं. मेकर्सला वाटत होतं की ख्रिसमसच्या मुहूर्तावर सिनेमा रिलीज करणं योग्य ठरेल. ख्रिसमस नंतर न्यू ईयरच्या निमित्तानंही सिनेमाला तगडी कमाई करता येईल असा अंदाज वर्तवला जात होता. पण सिनेमा ऑनलाईन लीक झाल्यामुळे आता मोठं नुकसान वाट्याला आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,रणवीर सिंग चा सर्कस सिनेमा बऱ्याच ऑनलाईन साईट्सवर लीक झाला आहे,ते देखील एचडी प्रिंट मध्ये. सिनेमा तामिळ रॉकर्स आणि फिल्मीजिला सारख्या वेबसाइट्सवर लीक केले गेला आहे. याचा मेकर्सला खूप मोठा फटका बसू शकतो कारण सर्कस ऑनलाईन लीक झाल्यामुळे आता थिएटरकडे प्रेक्षक जाईनासे झालेयत. पहिल्याच दिवशी हे चित्र दिसून आलं. ऑनलाईन लीक झालेला सिनेमा HD पासून 1080p आणि 720p या क्वालीटीमध्ये उपलब्ध आहे.
सर्कस सणाच्या धामधुमीत रिलीज केला गेला आहे. २०२२ मध्ये रिलीज होणारा बॉलीवूडचा हा शेवटचा सिनेमा आहे. पण असं असूनही सिनेमाचं हवं तसं स्वागत प्रेक्षकांनी केलं नाही. पहिल्या दिवशी फक्त ६ ते ७ करोड सिनेमानं कमावले आहेत. तर अॅडव्हान्स बूकिंगमध्ये सिनेमानं १.१० करोड पर्यंतच मजल मारली होती. देशभरात हा सिनेमा ३२०० हून अधिक स्क्रीन्स आणि जवळपास १०,००० शो..इतक्या मोठ्या स्तरावर रीलिज केला गेला आहे. पण ऑनलाइल लीक झाल्यामुळे सिनेमाचे तीन तेरा वाजणार हे निश्चित...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.