मुंबई - आर्यनच्या प्रकरणावर आज सुनावणी झाली खरी मात्र त्यात त्याला दिलासा मिळाला नाही. त्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. यासगळ्या प्रकरणात आर्यन खानची बहिण सुहानाची प्रकृती बिघडत असल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे. जेव्हापासून आर्यन तुरुंगात आहे तेव्हापासून सुहानाची प्रकृती बिघडत असल्याची माहिती समोर आली आहे. आज आर्यनला कोर्टाकडून जामीन मिळेल अशी आशा होती मात्र तसे झाले नाही. शाहरुखनं आर्यनला जामीन मिळावा म्हणून नव्या वकीलाची नेमणूक केली आहे. त्यांचे नाव अमित देसाई असे आहे. यापूर्वी त्यांनी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या खटल्याचे वकीलपत्र घेतले होते. सुहानाच्या प्रकृतीविषयी किंग खान सातत्यानं अपडेट घेत असल्याचं सांगण्यात येतंय.
मुंबई वरुन गोव्याला जाणाऱ्या क्रुझवरील रेव्हा पार्टीमध्ये एनसीबीनं कारवाई केली. त्यात आर्यन खानला अटक करण्यात आली. बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा तो मुलगा असल्यानं याप्रकरणाची सर्वाधिक चर्चा होते आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आर्यनला जामीन मिळावा यासाठी शाहरुख खान सातत्यानं प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्याला आपला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामध्ये अभिनेत्री रवीना टंडनपासून अभिनेता ऋतिक रोशनपर्यत यासगळ्यांचा समावेश आहे.
दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांनी देखील शाहरुखला पाठींबा दिला आहे. दिवसेंदिवस शाहरुखच्या डोकेदुखीत वाढ होताना दिसत आहे. काल त्याच्या भेटीला पुन्हा सलमान खान त्याच्या वडीलांसोबत गेल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर शाहरुखनं सलमानच्या खटल्यामध्ये जे वकील होते तेच आर्यनचे वकीलपत्र घेणार असल्याची बातमी सुत्रांनी दिली. त्यामुळे बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी शाहरुखला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नात असल्याचेही सोशल मीडियावरील पोस्टमधून दिसून आले आहे.
यासगळ्या प्रकरणात आर्यन खानची बहिण सुहाना आजारी पडली आहे. आपला भाऊ तुरुंगात आहे हे तिला सहन होत नसून ती सतत त्याच्याविषयी विचारत आहे. सुहाना प्रत्येक तासाला आपल्या आईला गौरी खानला आर्यनबद्दल विचारत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जेव्हापासून आर्यनला अटक झाली आहे तेव्हापासून शाहरुखची देखील चिंता वाढली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.