Shah Rukh Khan Visits Vaishno Devi: बॉलिवूड बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या जवान या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता जवान रिलिज व्हायरला फक्त काहीच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे शाहरुख आणि चित्रपटाची टिम या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चाहते त्याच्या ट्रेलरचीही आतुरतेने वाट पाहत आहे.
जवानचा दुसरा ट्रेलर ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. त्यापुर्वी शाहरुख खान माँ वैष्णोदेवीच्या दरबारात नतमस्तक झाला आहे. शाहरुखने माँ वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जवानच्या म्युझिक लॉन्चपूर्वी शाहरुख खानने जम्मूतील प्रसिद्ध माता वैष्णो देवी मंदिराला भेट दिली. या मंदिरातील शाहरुख खानचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी शाहरुख निळ्या रंगाचा जॅकेट टी-शर्ट, आणि डेनिममध्ये दिसत आहे. त्याने चेहरा मास्क मागे लपवला आहे. त्याच्यासोबत त्याचे बॉडिगार्डही दिसत आहेत.
आता शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. काहींनी शाहरुखचं कौतुक केलं तर काहींनी पुन्हा धर्मावरुन त्याला ट्रोल केले आहे.
तर दुसरीकडे शाहरुखच्या 'जवान' या चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचे चाहते याची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यापुर्वी शाहरुख चेन्नईतील साईराम अभियांत्रिकी महाविद्यालयात चित्रपटाचे संगीत लाँच करणार आहे.
हा कार्यक्रम आज दुपारी ३ वाजता होणार आहे. त्याचबरोबर शाहरुखच्या जवानचा ट्रेलर हा गुरुवारी रात्री बुर्ज खलिफा दाखवण्यात येणार असल्याच्याही चर्चा आहेत.
जवान चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाचे दिग्दर्शन दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांनी केले आहे.
ज्यात ज्यामध्ये शाहरुख खान पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात दिसेल त्याच्यासोबत चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा आणि सान्या मल्होत्राही दीपिका पदुकोण गिरीजा ओक, विजय सेतूपती यासारख्या कलाकारांची फौज आपल्याला जवानमध्ये दिसणार आहे.
हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.