शाहरुख खानने मागितली पालिका आयुक्तांची माफी.. म्हणाला, इक्बाल सिंह चहल...

अभिनेता शाह रुख खान याने इक्बाल सिंह चहल यांच्याविषयी ट्विट केले आहे.
shah rukh khan tweet on iqbal singh chahl
shah rukh khan tweet on iqbal singh chahl sakal
Updated on

Shah rukh khan : किंग खान म्हणून ओळखला जाणारा बॉलीवूड अभिनेता शाह रुख खान समाज माध्यमांची चांगलाच जोडला गेला आहे. त्याच्या आगामी 'पठाण' सिनेमाचे प्रमोशनही तो करत असतो. शिवाय आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी आणि कामाविषयीही तो लिहीत असतो. शाहरुख एक उत्तम वाचक आणि कलासक्त माणूस असल्याचे त्याने वेळोवेळो दाखवून दिले आहे. शिवाय बऱ्याच सामाजिक कामातही तो सहभागी असतो. त्यामुळे त्याच्या ट्विटर अकाउंटकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. यंदा शाहरुखने केलेले ट्विट काहीसे वेगळे आहे. मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांच्याविषयी शाह रुख बोलला आहे.

(bollywood star shah rukh khan tweet on covid worrier iqbal singh chahal and said sorry)

shah rukh khan tweet on iqbal singh chahl
अभिनेता सुमीत राघवनने केलं 'योगी आदित्यनाथ' यांचं कौतुक, कारणही आहे तसंच..

त्यामागे कारणही तसेच आहे. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिनाझ मर्चंट लिखित ‘इक्बाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि इतर बरेच मान्यवर उपस्थित होते. ज्यावेळी मुंबईत करोनाचा हाहाकार माजला होता त्यावेळी पालिका आयुक्तांनी कशा पद्धतीने परिस्थिती नियंत्रणात आणली. कशा उपयोजना कराव्या लागल्या. या संकटाची तीव्रता काय होती या सगळ्याचे चित्रण करणारे हे पुस्तक आहे मर्चंट यांनी इक्बाल सिंह चहल यांच्या खऱ्या अनुभवातून हे पुस्तक लिहिले आहे. (shah rukh khan on bmc)

या प्रकाशन सोहळ्याला शाहरुख खान यालाही आमंत्रण देण्यात आले होते. पण तो जाऊ शकला काही. पण तो एक पुस्तकवेडा असल्याने त्याने या पुस्तकाबाबत ट्विट केले आहे. यामध्ये त्यांचे पुस्तकाचा फोटोही शेअर केला आहे. 'अत्यंत खडतर परिस्थितीत कोविड विषाणूवर संशोधन करून त्यावर मात करण्याचे काम मुंबई महानगर पालिकेने केले. पालिकेच्या या कष्टाची आणि संघर्षाची सत्यकथा या पुस्तकातून आपल्या समोर आली आहे. हे पुस्तक आवर्जून खरेदी करून वाचा. आणि इकबाल सिंह चहल मला माफ करा मी पुस्तक प्रकाशनाला येऊ शकलो नाही,' असे ट्विट शाहरुख ने केले आहे. (shah rukh khan tweet on iqbal singh chahal)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.