बॉलीवूडमध्ये मोजक्याच अभिनेत्री आहेत ज्या आपलं मत परखडपणे व्यक्त करतात. त्यात स्वरा भास्कर या अभिनेत्रींचा सामावेश आहे. ती नेहमीच अनेक मुद्द्यावर उघडपणे आणि स्पष्टपणे बोलत असते. त्यामुळे ती वादीतही अडकते. स्वरा फक्त बॉलिवूडच्याच विषयावर नाही तर राजकारणाच्या विषयावरही आपले मत ठळक मांडते. नुकतचं राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रा' यावर तिनं केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे.
सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी 'भारत जोडो यात्रे'वर आहेत. याची बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चाही सुरु आहे. राहुल गांधींचा हा प्रवास दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुरू आहे, त्याच्या या यात्रेला काँग्रेसच्या मित्रपक्षही सहकार्य करत आहेत. त्यातच आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'ला पाठिंबा दिला आहे. स्वराने राहुल गांधींचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने राहुल गांधींचे अनेकदा कौतुक केले आहे.
स्वराने ट्विट करत राहुल गांधींचे कौतुक केले आहे. नुकतचं स्वराने भास्करने एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये 'भारत जोडो यात्रा' आणि राहुल गांधी यांच्याबद्दल बोलली आहे. या व्हिडिओसह स्वरा भास्करने लिहिले की, ' जिथ श्रेय बाकी आहे. निवडणुकीतील पराभव, ट्रोलिंग, वैयक्तिक हल्ले आणि सततची टीका निष्प्रभ असूनही, राहुल गांधी ना जातीय वक्तृत्वापुढे झुकले आहेत ना सनसनाटी राजकारणापुढे. या देशाची परिस्थिती पाहता @bharatjodo सारखा प्रयत्न कौतुकास्पद आहे! असं तिनं म्हटलं आहे.
स्वराचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी स्वरा आणि राहुलचे कौतुक केले आहे. तर काहींनी स्वरा भास्करलाही या प्रवासात येऊन राहुल गांधींना पाठिंबा देण्याचे सांगितले आहे. एकाने कमेंट करत लिहिलयं की, 'तू या प्रवासात का नाही आहेस? त्यांना सपोर्ट करणं गरजेच आहे. इतकच नाही तर काहींनी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे सर्वोत्तम उमेदवार म्हणून संबोधले आहे.
कामाच्या बाबतीत बोलायच झालं तर स्वरा भास्कर नुकतीच कमल पांडे यांनी दिग्दर्शित 'जहां चार यार' या चित्रपटात दिसली होती. यात स्वरा सोबत मेहर विज, शिखा तलसानिया आणि पूजा चोप्रा यांचा समावेश होता.स्वरा लवकरच तिच्या आगामी 'मिसेस फलानी'मध्ये दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.