बिग बॉस ओटीटी फेम आणि स्वत:ला फॅशन सेन्सेशन म्हणवून घेणारी उर्फी जावेद फॅशन नेहमीच चर्चेत असते. हि बया कधी काय वापरुन बातमी करेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. कारण उर्फी तिच्या विचित्र कपड्यांमुळे कमी पण कपडे म्हणून वापरणाऱ्या वस्तू यामूळे ट्रोल होत असते. तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यामुळे उर्फीला नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
मात्र उर्फी काही केल्या तिच्या फॅशनवर एक्सपेरिमेंट करणं सोडत नाही. आधीही तिने दगड, ब्लेड, जुने मोबाईल, चमकी, भांडी घासायचा काता तर कधी लोकरीच्या दोऱ्यापासून ड्रेस तयार करून परिधान केले आहे. त्यामूळे ती काय करेल याचा भरोसा नाही. तिने नुकताच तिच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हो व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने काहीच परिधान नाही केले , फक्त दोन पांढरा कलरचे वॉईन ग्लास समोर ठेवले आहे. आपले बरोबर ब्रेस्ट लपविले. तिने कपाळावर केसांची स्ट्रँड असलेली टॉप-नॉट हेअरस्टाइलसह बोल्ड मेकअप केलाय. तिने या व्हिडिओला 'तू आजा' या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन लावलेले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच ट्रोलिंगचा भडिमार सुरू झाला.
एकाने लिहिले "उर्फी आता तुला बोलणंच सोडून दिले आहे,कारण तुझी मानसिक परिस्थिती हाताबाहेर गेली आहे" " खरं तर हे आळशीपणाच लक्षण आहे" " उर्फी दीदी कधी सुधारणार तु" तर काहीना एक काळजी" ग्लास बाजूला गेला तर काय होईल" तर काहींना तिच्या आईला भेटायचे आहे.
तर एका नेटिझन्सने सांगितले की, “उर्फी जावेद शकलाका बूम बूम या लोकप्रिय शोमधील पेन्सिलसारखी दिसत आहे.” सध्या उर्फी अभिनेत्री सनी लिओन, अर्जुन बिजलानी आणि इतर स्पर्धकांसोबत स्प्लिट्सविला X4 मध्ये दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.