Vikram Gokhale: 'मारूतीच्या पायाला आज पाणी लागलं’, विक्रम गोखलेंच्या 'गुरुभगिनी' नीना कुळकर्णी

Vikram Gokhale
Vikram GokhaleEsakal
Updated on

Vikram Gokhale pass away: आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज त्यांची प्राणज्योत मालवली.

गोखले यांच्या जाण्याने मराठी सह हिंदी सिमेकलाकारचं नाही तर  प्रेक्षकांच्या मनाला धक्का बसवणारी आहे. त्यांच्या जाण्यानं कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे. मराठी, हिंदी चित्रपट विश्वातील मोठमोठया सेलिब्रेटींनी गोखले यांना आदरांजली वाहिली आहे. त्यातच अभिनेत्री नीना यांनी त्यांच्या या जवळच्या मित्रासाठी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

Vikram Gokhale
Vikram Gokhale: 'विक्रम गोखले म्हणजे....' पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

नीना म्हणतात की, 'विक्रम गोखले... माझा गुरु बंधु. तुझ्याबरोबर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांतून काम केलं. तुझी बहीण म्हणून तर कधी बायको म्हणुन ते अगदी आत्ता आत्ता तुझी सून म्हणूनदेखील. दरवेळी मला अभिनयातला एखादा नवीन पैलू तू दाखवून द्यायचास. तुझ्याकरता मी तुझी गुरु भगिनी आणि मैत्रिण होते. तुझ्याबरोबर काम करताना अनुभवणारी सहजता, काहीतरी मोलाचं गवसल्याचं कलात्मक समाधान. ह्या संचिताकरता मी तुझी ऋणी आहे. हा अनुभव पुन:पुन्हा मिळणे नाही.'

Vikram Gokhale
Vikram Gokhale Death: मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा..सिनेतारकांनी वाहिली श्रद्धांजली

पुढे त्या लिहितात की, 'तुझं थोरपण तुझ्या अभिनयातल्या सहजतेमध्ये होतं, तुझ्या व्यक्तीरेखा जाणून घेण्याच्या ताकदी मध्ये होतं. तुझ्यातल्या अभ्यासाच्या कुतुहलामध्ये होतं. असतील बहु, होतील बहु, परंतु या सम हा.' अभिनेत्रीने गोदावरी सिनेमातील विक्रम गोखलेंचा संवादही यावेळी लिहिला आहे. या सिनेमात नीना यांनी विक्रम गोखलेंच्या सूनेची भूमिका साकारली. त्यात विक्रम गोखले वारंवार विचारत असतात की 'मारुतीच्या पायाला पाणी लागलं का?' त्यांच्या निधनानंतर नीना म्हणतात की, 'मारूतीच्या पायाला आज पाणी लागलं'. नीना यांनी विक्रम गोखलेंना उत्कृष्ट अभिनेता आणि खूप चांगला मित्र म्हणत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नीना कुळकर्णी त्यांच्यासोबत विविध कलाकृतींमध्ये भूमिका केल्या होत्या. विक्रम गोखलें यांचा शेवटचा चित्रपट ‘गोदावरी’ होता. या चित्रपटात नीना यांनी त्याच्या सुनेची भूमिका केली आहे. जवळपास पन्नास वर्षे त्यांनी अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अनुभवाची इतकी संपन्नता असूनही ते प्रत्येकाशी आपुलकीने वागायचे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. 

Vikram Gokhale
Vikram Gokhale Death: विक्रम गोखलेंचे निधन, बॉलिवूडमध्ये शोककळा, दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.