The Kashmir Files ला 'कचरा' म्हणाले हे बॉलीवूड दिग्दर्शक; म्हणाले,'त्यावेळी काश्मिरमध्ये खरंतर..'

'द काश्मिर फाई्ल्स' वर टीका करत नुक्कड फेम दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी ९० सालात काश्मिरमध्ये घडलेल्या हत्याकांडा संदर्भात नवीन खुलासे केलेयत.
Director Saeed Akhtar Mirza Calls the kashmir Files ' Garbage',Says..
Director Saeed Akhtar Mirza Calls the kashmir Files ' Garbage',Says..Google
Updated on

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मिर फाईल्स' सिनेमा यावर्षी मार्चमध्ये रिलीज झाला होता. रिलीजच्या आधीपासनं सिनेमावरनं वाद सुरु झालेयत ते अजूनही सुरुच आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

काही दिवस आधी 'द काश्मिर फाईल्स' चर्चेत आला होता जेव्हा इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ इंडिया चा परिक्षक नादव लॅपिडनं या सिनेमाला 'अश्लील' आणि 'प्रोपेगेंडा' म्हणून हिणवलं होतं. अर्थात नंतर लॅपिडला आपल्या वादग्रस्त विधानासाठी माफी मागावी लागली होती. हा वाद थंड नाही होत तोवर लगेचच आता प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी 'द काश्मिर फाईल्स'ला 'कचरा' म्हणून संबोधलं आहे.(Director Saeed Akhtar Mirza Calls the kashmir Files ' Garbage',Says..)

Director Saeed Akhtar Mirza Calls the kashmir Files ' Garbage',Says..
Pathaan Controversy: 'म्हणून हे विष पेरायचं काम करतायत...', भगव्या बिकिनी वादात रत्ना पाठक यांची उडी

'नुक्कड' आणि 'इंतजार' सारख्या गाजलेल्या टी.व्ही मालिकां व्यतिरिक्त 'एल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?' आणि 'नसीम' सारख्या सिनेमांचे स्क्रीन रायटर आणि दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आजच्या सिनेमांवर परखड भाष्य केलं आहे. यामध्ये त्यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाविषयी भाष्य केलं आहे. 'द काश्मिर फाईल्स'नं बॉक्सऑफिसवर कमाई तर तगडी केली पण सिनेमा वादातही तितकाच राहिला.

Director Saeed Akhtar Mirza Calls the kashmir Files ' Garbage',Says..
Urfi Javed ला झालाय 'Laryngitis' हा विचित्र आजार,डॉक्टरांनी दिलीय सक्त ताकीद..म्हणाली..

सईद अख्तर मिर्झा म्हणाले आहेत की,''माझ्यासाठी 'द काश्मिर फाईल्स' कचरा आहे. काश्मिरी पंडित या मुद्द्याला मी कचरा म्हणत नाही. ते वास्तवच होतं. पण हे फक्त काश्मिरी हिंदूं बाबतीत घडलं का? तर नाही. मुसलमान देखील त्यावेळी तितकेच भरडले गेले होते. इथे मुद्दा कोणा एकाची बाजू मांडण्याचा नाहीच आहे. माणूस बना आणि या मुद्द्याला समजून घ्या''. सईद अख्तर मिर्झानी या गोष्टीवर दुःख व्यक्त केलं की, ''आजकाल देशभक्तीचा उपयोग पैसा कमावण्यासाठी होत आहे. जगभरात प्रत्येकजण हेच करतोय. हे मी फक्त भारतापुरतं बोलत नाही''.

Director Saeed Akhtar Mirza Calls the kashmir Files ' Garbage',Says..
Anushka Sharma: प्रसिद्ध ब्रान्ड विरोधात अनुष्का शर्माची पोस्ट, भडकलेल्या अभिनेत्रीनं दिला धमकीवजा इशारा..

'द काश्मिर फाईल्स' विषयी बोलायचं झालं तर हा सिनेमा ११ मार्च,२०२२ रोजी रिलीज झाला होता. फक्त १५ ते २५ करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं बॉक्सऑफिसवर तब्बल ३०० करोडचा गल्ला जमवला. या सिनेमात पल्लवी जोशी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती,चिन्मय मांडलेकर,दर्शन कुमार असे कलाकार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.