Shehzada Trailer: अल्लू अर्जुन बनण्याच्या नादात पडली कार्तिकची विकेट, लोक म्हणू लागलेयत...

कार्तिक आर्यनच्या 'शहजादा' सिनेमाचा ट्रेलर त्याच्या ३२ व्या वाढदिवसाच्या निमित्तानं २२ नोव्हेंबर,२०२२ रोजी रिलीज करण्यात आला होता.
Kartik Aaryan copy allu arjun look in his new Shehzada Movie, Netizens Troll Kartik.
Kartik Aaryan copy allu arjun look in his new Shehzada Movie, Netizens Troll Kartik. Google
Updated on

Shehzada Trailer: १० फेब्रुवारी २०२३ रोजी कार्तिक आर्यनचा 'शहजादा' सिनेमा रिलीज होतोय. याचा टीझर नुकताच २२ नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. कार्तिक आर्यन आणि कृती सनन अभिनित या सिनेमाचा पहिला लूक पहायला लोक गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुक होते. पण जसा लूक पाहिला तसं आता लोक सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी करताना दिसत आहेत.

याचं कारण आहे की ५९ सेकंदाच्या टीझरमध्ये एके ठिकाणी कार्तिक अल्लू अर्जुनची कॉपी करताना दिसला ते म्हणे खटकलं अल्लूच्या चाहत्यांना. यानंतर आता लोकांनी कार्तिकची शाळा घ्यायला सुरुवात केली आहे. तसंच, अल्लू अर्जुनचा जो लूक कार्तिकनं कॉपी केला आहे त्याचा फोटो देखील शेअर करत पोलखोल केली आहे.(Kartik Aaryan copy allu arjun look in his new Shehzada Movie, Netizens Troll Kartik.)

Kartik Aaryan copy allu arjun look in his new Shehzada Movie, Netizens Troll Kartik.
Bollywood:अनुष्का-विराटचा बदलला मुंबईतील पत्ता; आता 'या' ठिकणी राहणार भाड्याने, महिन्याचं भाडं ऐकाल तर..

आता प्रश्न हा नाही की लोक सिनेमावर काय म्हणतायत. मुळ मुद्दा तर हा आहे की अल्लू अर्जुन बनण्याच्या नादात कार्तिक आर्यननं आपल्याच पायावर धोंडा तर नाही मारला ना. कारण हा असा रावडी लूक साकारून त्यानं आपल्या चॉकलेट बॉय इमेजचा गळा तर घोटला नाही ना, असं सारखं वाटू लागलंय.

लोकांना नेहमी नवं पहायचं असतं म्हणून सिनेमावाले प्रयोग करतात हे चांगलेच आहे. पण ते करताना थोडं भान मात्र नक्कीच राखायला हवं. असं काहीतरी करू नका जे पाहताना स्वतःचे डोळे बंद करावे लागतील. कार्तिक खरंतर एक चांगला अभिनेता आहे,यात दुमत नाहीच. तो कॉमेडी आणि रोमॅंटिक सिनेमे करतो,ज्यात तो लोकांना खूप आवडतो. सध्या तर तो खूप चर्चेत पहायला मिळत आहे. आता त्याचं नाव सुपरस्टार्सच्या यादीत घेतलं जातंय. त्यानं एका पाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण याचा अर्थ असा नक्कीच होत नाही की कोणालाही कॉपी करा आणि लोकांसमोर या. काम असं करा की न बोलता त्याची चर्चा व्हायला हवी.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

अल्लू अर्जुन साऊथच नाही पॅन इंडियाचा देखील सुपरस्टार आहे. त्यानं 'पुष्पा' च्या माध्यमातून जी काही लॅमलाइट खेचून घेतलीय ते फार कमी स्टार्सच्या नशिबी आलंय. याचा अर्थ असा नाही की पुष्पामुळे अल्लू अर्जुन चर्चेत आला. याआधीही त्याचे सिनेमे तेवढेच धुमाकूळ घालायचे. पण पुष्पा मुळे बॉलीवूडमध्येही त्याचा दबदबा निर्माण झाला. आता त्याच्याच 'अला वैकुंठपुरमुलु' या सिनेमातील लूक कार्तिक आर्यननं कॉपी केला आहे,ज्यामुळे तो ट्रोल होऊ लागलाय.

कार्तिक आर्यनची इमेज आतापर्यंत चॉकलेट बॉयची होती. त्याच्या फिमेल फॅन्स तर भरपूर आहेत. मुली त्याच्या क्युट आणि साध्याभोळ्या लूकवर जीव ओवाळून टाकताना दिसतात. पण आता अल्लू अर्जुन बनण्याच्या नादात त्याची ही ओळख पुसली जाऊ शकते. कारण आधी देखील इंडस्ट्रीत असे कलाकार होऊन गेलेयत, ज्यांनी काहीतरी हटके करण्याच्या नादात आपली मूळ चॉकलेट इमेज पुसून टाकली होती. या यादीत रणबीर कपूर,वरुण धवन, रणवीर सिंग,आदित्य रॉय कपूर,सिद्धार्थ मल्होत्रा,विक्की कौशल अशी नावं घेता येतील. लोकांच्या मनावर भले हे कलाकार आज राज्य करतायत पण असं असलं तरी त्यांच्या जुन्या एखाद्या सिनेमातील परफॉर्मन्ससोबत त्यांची तुलना अनेकदा केली जाते.

या सगळ्या अभिनेत्यांनी रोमॅंटिक सिनेमातून आपली एक इमेज बनवली आणि नंतर रावडी लूक साकारला,पण पहिल्यासारखी भूरळ लोकांना ते घालू शकले नाहीत. आता कार्तिकसोबतही असं होऊ शकते. पाहिलं तर अल्लू अर्जुनचा चाहता वर्ग मोठा आहे. आणि सध्या बॉलीवूडच्या स्टार्सला ग्रहण लागलंय. सिनेमे काही खास चालताना दिसत नाहीयत. साऊथचे सिनेमे कॉपी करण्याचा तसाही ठप्पा त्यांच्यावर लागला आहे. आता लूक देखील कॉपी करू लागले तर झालं तर मग. आता 'शहजादा' सिनेमा रिलीज झाल्यावर बॉक्सऑफिसवर काय कमाल करतो,हे येणारा काळच सांगेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.