Pankaj Tripathi: अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी १९ वर्षांपूर्वी आपल्या सिने कारकिर्दीला सुरुवात केली होती. सुरुवातीचे काही वर्ष स्ट्रगल केल्यानंतर पंकज त्रिपाठीने मेहनतीने इंडस्ट्रीत आपलं स्थान पक्क केलं. आज अनेक निर्माते त्याच्यासोबत काम करायला उत्सुक आहेत. पंकज त्रिपाठीजवळ आज बॉलीवूडच नाही तर साउथ सिनेमांच्या देखील ऑफर आहेत. पण पंकज त्रिपाठीला मात्र साऊथ सिनेमात काम करावसं वाटत नाही. त्यानं आतापर्यंत अनेक साऊथ सिनेमांच्या ऑफर्स रिजेक्ट केल्या आहेत. (Pankaj Tripathi reveals why he does not wotk in south films and rejects the offer)
पंकज त्रिपाठीला साऊथ सिनेमात काम करायचं नाहीय हे खरंय,पण का? पंकज त्रिपाठीने खरंतर आपलं करिअर २००३ मध्ये कन्नड सिनेमातून सुरू केलं होतं. त्यानंतर त्यानं तेलुगू,तामिळ सिनेमात एखाद-दुसरा सिनेमा केला. पंकज त्रिपाठीला फक्त साऊथच नाही तर हॉलीवूड किंवा अन्य भाषेतील सिनेमातही काम करायचे नाही. गोव्यामध्ये सुरु असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया मध्ये पंकज त्रिपाठीनं याविषयी बोलून दाखवलं आहे.
पंकज त्रिपाठी म्हणाला,''भाषा माझ्यासाठी अडसर नाहीच मुळी, पण हिंदी सिनेमाला माझं कायम प्राधान्य राहील. कारण हिंदी भाषा मला उत्तम येते आणि त्यामुळे त्याच्यात काम करताना सहजता असते. मी त्या भाषेतल्या अनेक छोट्या गोष्टी उत्तम जाणतो आणि समजतो. मला तेलुगू आणि मल्याळम फिल्ममेकर्सनी ऑफर दिल्या होत्या पण मला वाटतं की त्या सिनेमांसोबत मी न्याय नाही करू शकणार कारण त्या भाषा मला समजत नाहीत,मी त्या बोलूही नाही शकणार''.
पुढे पंकज त्रिपाठीनं सांगितलं की,''जर एखाद्या अन्य भाषेच्या सिनेमातील एखादी व्यक्तिरेखा हिंदी भाषा बोलणारी असेल तर मी त्या सिनेमात नक्कीच काम करेन''. पंकज त्रिपाठी सध्या बऱ्याच हिंदी सिनेमात काम करत आहे,त्यामुळे सध्या त्याच्याकडे साऊथ सिनेमात काम करण्यासाठी वेळ नाहीय.
हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?
पंकज त्रिपाठीच्या काही आगामी सिनेमांविषयी बोलायचं झालं तर,'ओह माय गॉड!2' मध्ये तो दिसणार आहे. यावर्षी तो 'शेरदिल: 'द पीलीभीत सागा'' व्यतिरिक्त 'क्रिमिनल जस्टिस: अधूरा सच' वेब सिरीजमध्ये दिसणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.