Salman Khan Case: सलमान खान विरुद्धचा खटला कोर्टानं फेटाळला; म्हणाला, 'सेलिब्रिटी असल्यामुळे'

Salman Khan Case
Salman Khan CaseEsakal
Updated on

सलमान खान सध्या त्याच्या किसी की जान किसी का भाई या चित्रपटामुळे चर्चेत आहेत . त्याबरोबर त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणात काल पोलिसांनी कारवाई करत एक अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. आता सलमान खान संबधित दुसरी बातमी समोर आली आहे.

Salman Khan Case
Sai Tamhankar: मी वडिलांवर अंत्यसंस्कार केले आणि लगेचच.. हा किस्सा वाचून सईच्या हिमतीला सलाम कराल..

सलमानला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने त्याच्यावरील 2019 चा खटला फेटाळला आहे आणि त्याला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे.

त्याचबरोबर हा दाखल करण्यात आलेला फौजदारी खटला रद्द करण्याचा आदेश कोर्टानं दिला. न्यायालयाने हेही निरीक्षण नोंदवले की, केवळ आरोपी सेलिब्रिटी आहे म्हणून न्यायालयीन प्रक्रियेला विनाकारण त्रास दिला जाऊ नये.

Salman Khan Case
Hema Malini Video: चक्क मेट्रोत बसंती, रिक्षातूनही ड्रीम गर्लनं केला प्रवास, प्रवाशांना बसला शॉक..

या आदेशात म्हटले आहे की, केवळ आरोपी प्रसिद्ध सेलिब्रिटी असल्याने न्यायालयीन प्रक्रियेचा विनाकारण छळ होऊ नये आणि कायद्याची योग्य प्रक्रिया न पाळता तक्रारदाराच्या हातून त्याचा छळ होऊ नये. ज्याने केवळ बदला घेण्यासाठी या प्रकरणाला हवा दिली आणि सलमान खानने आपला अपमान केला असं गृहीत धरलं .

न्यायाधीश म्हणाले- हा एक वेगळ्या प्रकारचा खटला होता जिथे सलमान खान आणि त्याचा अंगरक्षक शेख यांच्यावर कारवाई करणे गैरवर्तनापेक्षा कमी नाही. ही कारवाई सुरू ठेवल्यास गंभीर अन्याय होईल, असेही न्यायमूर्ती डांगरे यांनी निकालात म्हटले आहे.

Salman Khan Case
Lucky Ali: 'इब्राहिमपासूनच ब्राह्मण शब्दाची निर्मिती'.., गायकाच्या वक्तव्यामुळे खळबळ आता म्हणतोय,' मला फक्त..'

अशोक पांडे या पत्रकाराच्या तक्रारीवरून हा आदेश देण्यात आला आहे ज्याने अभिनेता आणि त्याच्या अंगरक्षकाने आपल्याला धमकावले आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्यावेळी सलमान खानने समन्सला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली. 5 एप्रिल 2022 रोजी उच्च न्यायालयाने समन्सला स्थगिती दिली. पांडेने एप्रिल 2019 मध्ये सलमान खान आणि शेख यांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.