Haddi Film: 'हड्डी' रिलिज होणार! नवाजुद्दीन सिद्दीकीला कोर्टाचा दिलासा; न्यायालयाने विवेक ओबेरॉयची याचिका फेटाळली..

Haddi movie
Haddi movieEsakal
Updated on

Nawazuddin Siddiqui Upcoming Movie : बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा टायगर ट्रेल आणि ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट एलएलपीचा या दोन प्रोडक्शन कंपन्यांचा मालक आहे. विवेक ओबेरॉय याने नवाजुद्दीन स्टारर 'हड्डी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती.

'हड्डी' च्या निर्मात्यांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर आता मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला. ‘हड्डी’ या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.

Haddi movie
KBC 15: 1 कोटी जिंकणारा जसकरण 7 कोटीच्या प्रश्नावर मात्र अडकला! तुम्हाला येईल का 'या' प्रश्नाचं उत्तर?

हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी OTTP वर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. ‘हड्डी’ चित्रपटावर बंदी घातल्याने कोणाचाही फायदा होणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मात्र अद्याप हे प्रकरण मिटलेले नाही.हे प्रकरण आर्थिक व्यवहाराचे असल्याने ही सुनावणी सुरूच राहणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

Haddi movie
Jawan Fever: महाराष्ट्रात या ठिकाणी मध्यरात्री २ वाजता प्रेक्षकांची रांग, जवान पाहण्यासाठी शाहरुखच्या फॅन्सची गर्दी

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'हड्डी' या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे. या चित्रपटात तो एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी स्वतःला भाग्यवान समजतो की तो ही व्यक्तिरेखा साकारत नाही. इतकेच नाही तर त्याच्या भूमिकेमुळे ट्रान्सजेंडर समुदाय आणि त्याच्यासमोरील समस्यांबद्दलचे त्यांचे मत बदलले असल्याचं त्याने सांगितलं.

Haddi movie
Kangana Ranaut:"मी तर आधीच सांगितलं होत...", इंडिया नामकरणाच्या प्रकरणावरही कंगनाने मारली उडी!

अजय शर्माच्या 'हड्डी' चित्रपटात नवाजशिवाय इला अरुण आणि अनु कश्यप हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

नवाजच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास तो 'हड्डी' व्यतिरिक्त 'सैंधाव' आणि 'सेक्टर 108'मध्ये देखील दिसणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.