Ketaki Chitale: केतकी चितळेच्या आयुष्यावर लवकरच येणार पुस्तक, तुरुंगातला संघर्षमयी प्रवास उलगडणार

केतकीच्या आयुष्यावर आता पुस्तक येणार आहे. केतकीने स्वतः याचा खुलासा केलाय.
 book on the life of Ketaki Chitale, unfolds his  journey in prison
book on the life of Ketaki Chitale, unfolds his journey in prisonSAKAL
Updated on

Ketaki Chitale Book Launch News: मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. केतकी चितळेने मोठा खुलासा केलाय.

केतकीच्या आयुष्यावर आता पुस्तक येणार आहे. केतकीने स्वतः याचा खुलासा केलाय.

(book on the life of Ketaki Chitale, unfolds his journey in prison)

 book on the life of Ketaki Chitale, unfolds his  journey in prison
Alan Arkin: ऑस्कर विजेता अभिनेत्याचं निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

केतकी चितळेला तुरुंगवास का भोगावा लागला?

केतकी चितळेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तिला तुरुंगातही जावे लागले होतं. केतकीच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार केतकीला अटक झाली होती. केतकीला ठाणे सत्र न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात केतकीला ४१ दिवस तुरुंगवास भोगावा लागला.

काल रात्री केतकीनं इन्स्टाग्राम लाईव्ह केलं होत. यामध्ये मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी करा, मतदान करा. युसीसीबाबत तुमचं मत मांडा.

एपिलेप्सी कम्युनिटीमध्ये असलेला आकाश दीक्षित हा कशाप्रकारे फसवणूक करत आहे, असे अनेक मुद्दे केतकीने इन्स्टाग्रामवर लाईव्हवर मांडले.

याच वेळी तिनं एका चाहत्याला उत्तर देताना मोठा खुलासा केला. केतकी म्हणाली कि पुढच्या वर्षी माझ्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित होणार असल्याचं तिने सांगितलं.

 book on the life of Ketaki Chitale, unfolds his  journey in prison
Parineeti Chopra at Amrutsar: लग्नाआधी परिणीती - राघव सुवर्णमंदिरात नतमस्तक, या तारखेला राजस्थानमध्ये सनई चौघडे

केतकीच्या एका फॅनने तिला विचारलं की, “तुमची स्टोरी काय?” यावर उत्तर देताना केतकी म्हणाली, “पुढच्या वर्षी माझं पुस्तक प्रकाशित होतंय. तर जरुर विकत घ्या. तुम्हाला माझं संपूर्ण आयुष्य नाही,

पण तुरुंगात जायचा प्रवास आणि त्यामागील कारण कळेल. पुढच्या वर्षी ते पुस्तक प्रकाशित होतंय. माझ्याबाबतीत नेमकं काय घडलं होतं? तुरुंगातला अनुभव कसा होता?

यावर हे पुस्तक लिहिण्यात आलेलंय. कृपया, जेव्हा पुस्तक प्रकाशित होईल तेव्हा जरूर विकत घ्या.” अशाप्रकारे केतकी चितळेच्या पुस्तकाची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.