Gandhi Godse Ek Yudh : गांधी-गोडसेंना करावा लागणार पठाण शी सामना

२६ जानेवारीला राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी - गोडसे' प्रदर्शित होतोय.
Gandhi Godse: गांधी - गोडसेंना करावा लागणार पठाण शी सामना
Gandhi Godse: गांधी - गोडसेंना करावा लागणार पठाण शी सामना SAKAL
Updated on

शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाची सगळीकडे जोरदार हवा आहे. ४ वर्षांनी 'पठाण' च्या माध्यमातून शाहरुख खान प्रमुख भूमिकेतुन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

२५ जानेवारीला पठाण रिलीज होतोय. तर पुढच्याच दिवशी म्हणजे २६ जानेवारीला राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी - गोडसे' प्रदर्शित होतोय. त्यामुळे एकूणच पठाण सोबत गांधी - गोडसे सिनेमाचा सामना रंगणार असं चित्र दिसतंय.

राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी गोडसे एक युद्ध' सिनेमात चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेंची भूमिका साकारणार आहे. सिनेमाची कथा वेगळी आहे. गोडसे गांधींवर गोळ्या झाडतो पण गांधी त्यातून वाचतात.

पुढे गांधींना नथुरामला भेटण्याची इच्छा असते, अशी या सिनेमाची भन्नाट कल्पना आहे. रिलीजआधीच सिनेमाची चर्चा आहे. परंतु पठाण या बिग बजेट सिनेमासमोर गांधी - गोडसे सिनेमा टिकणार कि सपशेल आपटणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

दुसरीकडे पठाण सिनेमाची गेली अनेक वर्ष चर्चा आहे. शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम अशा तगड्या कलाकारांची फौज आहे.

२५० कोटी अशा भव्यदिव्य बजेट मध्ये पठाण सिनेमा बनला आहे. यशराज फिल्मसला २५ जानेवारीला ५० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पठाण २५ जानेवारी २०२३ ला संपूर्ण भारतात रिलीज होतोय. शाहरुखचे फॅन्स या सिनेमाची गेली अनेक वर्ष प्रतीक्षा करत आहेत.

Gandhi Godse: गांधी - गोडसेंना करावा लागणार पठाण शी सामना
Shahrukh Khan: 'आता रिटायरमेंट घे..',. नेटकऱ्यानं डिवचल्यावर गरजला 'पठाण'

पठाण, गांधी - गोडसे हे दोन वेगवेगळ्या विषयांवरचे सिनेमे एकमेकांसमोर आल्यावर कोणता सिनेमा हिट होणार आणि कोणता सिनेमा फ्लॉप होणार, याचा अंदाज प्रेक्षक आणि समीक्षक लावत आहेत. आता काहीच दिवसात चित्र स्पष्ट होईल.

Gandhi Godse: गांधी - गोडसेंना करावा लागणार पठाण शी सामना
Shahrukh Khan : ऑस्करच्या बाहुलीला मला हात लावू देशील? किंग खान मनपासून बोलला की टोमणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.