Bramhastra: सुशांतचं 'ब्रम्हास्र' बॉलीवूडला करेल भस्म, बहिण मीतूची जळजळीत प्रतिक्रिया

सुशांतच्या बहिणीनं पुन्हा एकदा बॉलीवूडवर तीव्र शब्दांत आपला राग व्यक्त केला आहे.
Boycott Bramhastra
Boycott Bramhastraesakal
Updated on

Boycott Bramhastra movie: आलिया रणबीरचा ब्रम्हास्त्र प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते. अनेकांनी ब्रम्हास्त्रला बॉयकॉट (Social media viral news) करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे त्याच्या कमाईचे जे आकडे व्हायरल झाले आहेत त्यावरुन काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नाराजी व्यक्त केली असून ते आकडे खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यात कंगनानं देखील कडाडून प्रतिक्रिया देत हे सारं खोट्या पद्धतीनं समोर येत असल्याची पोस्ट शेयर केली आहे.

यासगळ्यात बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीनं नीतूनं एक परखड प्रतिक्रिया दिली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सुशांत सिंगच्या फॅन्सनं ब्रम्हास्त्रवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी यावेळी सुशांत सिंग राजपूत, बॉलीवूडमधील नेपोटिझम याकडे लक्ष वेधले आहे. ब्रम्हास्त्र प्रदर्शित झाल्यापासून त्याला वेगवेगळ्या कारणानं बॉयकॉट केले जात आहे. काहींनी आलियाच्या वक्तव्यावरुन या चित्रपटाला ट्रोल केले आहे. तर काहींनी रणबीरच्या गोमांस खाण्याचं वक्तव्य अनेकांना बॉयकॉटसाठी पुरलं आहे. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

यासगळ्यात सुशांत सिंगची बहिण मीतूनं आपली नाराजी व्यक्त केली आहे. तिनं ब्रम्हास्त्रवरुन एक पोस्ट शेयर केली आहे. त्या पोस्टमध्ये ती म्हणते, सुशांतचं ब्रम्हास्त्र बॉलीवूडचा नष्ट करण्यासाठी पुरेसं आहे. बॉलीवूडला नेहमीच लोकांवर राज्य करायचे आहे. त्यांची तशी मानसिकताही आहे. ते अनेकदा दिसून आली आहे. त्यांना स्वताची मनमानी करायची आहे.

Boycott Bramhastra
Kunal Kamra: 'चार चवन्नी घोडे पे, तुम्हारा गोडसे...' कुणाल कामराचं वादग्रस्त ट्विट

मीतुनं बॉलीवूडवर तीव्र शब्दांत आपला राग व्यक्त केला आहे. दरवेळी प्रेक्षकांना आपलेसं करणं हे त्यांना आवडतं. त्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. नैतिक मुल्यांना बॉलीवूडमध्ये काहीही स्थान नसल्याचे दिसून आले आहे. मीतूच्या त्या पोस्टला सुशांतच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. त्यावर मोठ्या संख्येनं प्रतिक्रियाही व्हायरल झाल्या आहेत. कित्येकांनी बॉयकॉट ब्रम्हास्त्र असा ट्रेंड सुरु केला असून त्यालाही जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसते आहे.

Boycott Bramhastra
Brahmastra Review: नुसताच 'लखलखाट', पदरी 'भ्रमनिरास्त्र'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.