Thank God चित्रपटालाही ग्रहण : कायस्थ समाजाचा जोरदार विरोध

अजय देवगणच्या अडचणी अजून वाढणार ...
Thank God movie boycott
Thank God movie boycottesakal
Updated on

Bollywood: च्या चित्रपटांवर बॉयकॉटचे ढग दाटले असतानाच आता अजय देवगणचा आगामी चित्रपट 'थँक गॉड' रिलीज होण्यापूर्वीच बॉयकॉट आणि त्याच्या चित्रपटातील भूमिकेमुळे वादात सापडला आहे.कायस्थ समाजाचे आराध्य भगवान चित्रगुप्त यांचा अपमान केल्याचा आणि समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप समाजाकडून करण्यात येत आहे.

याआधीही यूपीच्या जौनपूरमध्ये कायस्थ समाजाने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. यानंतर मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनीही याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. यानंतर अखिल भारतीय कायस्थ महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सक्सेना यांच्या नेतृत्वात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना जिल्हा प्रशासनामार्फत निवेदन देण्यात आले. (Bollywood)

Thank God movie boycott
Boycott Ajay Devgan म्हणू लागेलयत लोक, अभिनेत्याचा 'थॅंक गॉड' सिनेमा रडारवर

चित्रपटातील काही दृश्य काढण्याची मागणी आत करण्यात आहे. तसेच अजय देवगण, चित्रपटाचे निर्माते,दिग्दर्शक आणि मारूती इंटरनॅशनल यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी नाहीतर देशभर आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतलीय.

Thank God movie boycott
Boycott Bollywood : बॉयकॉट बॉलिवूड हा राक्षस आपले रौद्र रूप दाखवतोय

येत्या शुक्रवारी 'Thank God'हा चित्रपट रीलीज होणार आहे. ज्यात अजय देवगण,सिद्धार्थ मल्होत्रा,रकुल प्रित सिंग यांच्या प्रमुख भूमिका असून हा एक Comedy movie आहे. मात्र,आता #BoycottThankGod हा ट्रेंड आणि चित्रपटाला होणारा जोरदार विरोध यामुळे चित्रपटाच्या कमाईला मोठा फटका बसणार असण्याचे बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.