Boyz 3: चित्रपटाला बेळगावातून तीव्र विरोध; 'त्या' संवादांवर आक्षेप..

या चित्रपटातील संवादामुळे कानडी-मराठी वादाने पुन्हा डोकं वर काढलं आहे.
boyz 3 marathi movie ban in belgaum karnataka  objection on kannad and marathi dispute dialogues
boyz 3 marathi movie ban in belgaum karnataka objection on kannad and marathi dispute dialogues sakal
Updated on

Boyz 3: 'बॉईज' आणि 'बॉईज २' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातल्यानंतर धैऱ्या, ढुंग्या आणि कबीर हे धमाल त्रिकुट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या तिसऱ्या भागात अभिनेत्री विदुला चौगुलेच्या अभिनयाचा तकडा देखील असणार आहे. आज १६ सप्टेंबर रोजी 'बॉईज ३' हा चित्रपट महाराष्ट्रासह देशभरात प्रदर्शित झाला. धमाल विनोदी आणि तरुणांच्या विषयवार आधारलेल्या या चित्रपटाला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद असला तरी बेळगावातून मात्र विरोध होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या चित्रपतील एक संवाद तिथल्या काही संस्थांना खटकला आहे. (boyz 3 marathi movie ban in belgaum karnataka objection on kannad and marathi dispute dialogues )

'बॉइज 3' या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला कर्नाटक रक्षण वेदिके संघटनेने विरोध दर्शवला असून, त्यामुळे हा चित्रपट बेळगावात प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटातील काही संवादवर आक्षेप घेतला गेल्याने बेळगावात या चित्रपटाला विरोध झाला. कन्नड भाषा, कर्नाटक पोलीस यांचा अवमान होण्यासारखे संवाद चित्रपटात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

बेळगावात प्रकाश आणि ग्लोब या चित्रपटगृहात शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, या विरोधानंतर हे प्रदर्शन रोखण्यात आले. या चित्रपटाच्या एका दृश्यात पोलीस स्थानकात आलेल्या तरुणाला पोलीस स्थानकातील अधिकारी म्हणतो, ‘नो मराठी, ओन्ली इंग्लिश, इलदिद्र कन्नड’. त्यावर तो तरुण पोलीस अधिकाऱ्याला सांगतो, ‘साहेब जर तुम्हाला तुमच्या भाषेचा माज करता येतो, तर आम्हाला आमच्या भाषेची लाज राखता येते. मराठी भाषेचा माज बेळगावात दाखवायचा नाही, तर कुठे दाखवायचा?’, असा सवाल तो तरुण पोलीस अधिकाऱ्याला करतो.

चित्रपटातील याच संवादाला कर्नाटक रक्षण वेदिकेने आक्षेप घेतला असून, यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉइज थ्री चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या चित्रपटामुळेबेळगावात कानडी मराठी वाद पुन्हा उफाळून आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.