ब्रह्मास्त्रने रचला इतिहास! पहिल्या दिवशी बाॅक्स ऑफिस कलेक्शन झाले इतके

बायकाॅट ट्रेंडिंगला असतानाही ब्रह्मास्त्र चित्रपटाने रचला इतिहास !
Brahmastra
Brahmastra esakal
Updated on

Brahmastra Box Office Opening Collection : चित्रपट निर्माता अयान मुखर्जीला ब्रह्मास्त्र चित्रपट बनवण्यासाठी जवळपास 8 वर्षे लागली. चित्रपटाची समीक्षा आणि कलेक्शन अहवालांनंतर असे दिसते की त्यांच्या मेहनतीला यश आले आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि मौनी रॉय स्टारर ब्रह्मास्त्र चित्रपटावर सोशल मीडियावर बहिष्कार टाकला जात आहे.

दुसरीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा पहिला भाग संपल्यानंतर दुसऱ्या भागाच्या 'ब्रह्मास्त्र 2 : देव'ची उत्सुकता वाढली आहे. ब्रह्मास्त्रच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कमाईबद्दल जाणून घेऊया..

Brahmastra
Brahmastra : 'ब्रह्मास्त्र'चा बंपर ओपनिंग, पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई?

ब्रह्मास्त्रचा ओपनिंग डे कलेक्शन किती?

ब्रह्मास्त्र हा २०२२ मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. एकीकडे या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला असताना दुसरीकडे बॉलिवूडच्या (Bollywood News) बहिष्कारामुळे त्रस्त असलेल्या प्रेक्षकांनाही या चित्रपटाने खूप आशा दाखवल्याआहेत.

चित्रपटाने पहिल्या दिवशी ३५-३६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अहवालानुसार, नॉन हॉलिडे रिलीजवर असे कलेक्शन करणे म्हणजे हिंदी सिनेमासाठी इतिहास रचण्यासारखे आहे. यापूर्वी बाहुबली-२ या चित्रपटाने अशी बंपर कमाई केली होती.

Brahmastra
Video : काजोल विमानतळावर छायाचित्रकारांना पाहाताच धावली, म्हणाली...

दक्षिण भारतातही चांगला प्रतिसाद

ब्रह्मास्त्रच्या हिंदी आवृत्तीने जवळपास ३२ ते ३३ कोटी रुपये कमावले आहेत. त्याच वेळी, इतर भाषांमधील रिलीज व्हर्जनमधून सुमारे ३ कोटींचे कलेक्शन झाले आहे. या चित्रपटाच्या साऊथ व्हर्जन्सनी जवळपास ९-१० कोटींची कमाई केल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने तेलुगू प्रेक्षकांनी चांगल प्रतिसाद दिल्याने चांगले कलेक्शन झाले आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला. अवघ्या तीन दिवसांत हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.