Brahmastra : ‘ब्रह्मास्त्र’ला मागणी; काही चित्रपटगृहात चालतोय पहाटे अन् लेट नाइट शो

चित्रपटाने पहिल्या दिवशी ३५ कोटींची कमाई केली
Brahmastra Movie Latest News
Brahmastra Movie Latest NewsBrahmastra Movie Latest News
Updated on

Brahmastra Movie Latest News अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटगृहे (Movie) हाऊसफुल्ल (Housefull) होत आहेत. काही चित्रपटगृहांमध्ये पहाटे आणि लेट नाइट शोची मागणी वाढत आहे.

शनिवारी काही ट्विटर वापरकर्त्यांनी दिल्लीतील काही चित्रपटगृहांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यात शो सकाळी ६ वाजता सुरू होत आहेत तसेच रात्री उशिरापर्यंत शो दाखवला जात आहे. दिल्लीशिवाय मुंबई आणि इतर शहरांमध्येही ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाची क्रेझ पाहता चित्रपटगृहांमध्ये शो वाढले गेले आहेत.

Brahmastra Movie Latest News
बॉलिवूडचे सर्वांत महागडे घटस्फोट; द्यावं लागली इतकी पोटगी

शुक्रवारी अनेक आयमॅक्स शो हाऊसफुल्ल झालेत. रविवारच्या शोची तिकिटेही (Movie) विकली गेली आहेत. यामुळेच आम्ही शो वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे एकाने सांगितले. एवढेच नाही तर काही चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट जवळपास २१ तास चालत आहे. पहिला शो सकाळी ६ वाजता सुरू होतो आणि रात्री ३ वाजेपर्यंत चालत आहे.

‘हे फक्त वीकेंडसाठी असू शकते. ते देखील आयमॅक्स आणि ३D साठी’, असेही म्हटले जात आहे. वास्तविक थ्रीडी आणि व्हीएफएक्सची स्तुती ऐकल्यानंतर लोकांना आता अधिकाधिक आयमॅक्स आणि थ्रीडीमध्ये चित्रपट पाहण्याची इच्छा होत आहे. त्यामुळेच या चित्रपटाची मागणी वाढत आहे. कदाचित वीकेंडनंतर ही क्रेझ कमी होईल.

Brahmastra Movie Latest News
Hrithik Roshan : चाहत्याच्या कृत्यावर हृतिक रोशन झाला नाराज; संतापून म्हणाला...

पहिल्या दिवशी ३५ कोटींची कमाई

चित्रपटाने पहिल्या दिवशी ३५ कोटींची कमाई केली. जगभरात चित्रपटाने ७५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या वीकेंडला हा चित्रपट जगभरात २०० कोटींची कमाई करू शकतो, असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.