Brahmastra 2: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा रिलीजनंतर भलताच चर्चेत आहे. 'ब्रह्मास्त्र पार्ट 1- शिवा' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता ओटीटीवर लोकांच्या भेटीस आला आहे. आता या सिनेमाची चर्चा होतेय पण त्याच्या सीक्वेलच्या स्टारकास्टविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत. (Brahmastra part 2 cast secret open, big name confirm)
सुरुवातीपासून 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' मध्ये दीपिका पदूकोण असणार का यावरनं चर्चा रंगली होती. पण आता यासंदर्भात कन्फर्म माहिती समोर आली आहे. 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' मध्ये कोण असणार,कोण नाही यासंदर्भात माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर दीपिका पदूकोणचा एक व्हिडीओ समोर आला आहे,ज्याचा संबंध 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' सोबत जोडला जात आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दाखवलं गेलं आहे की दीपिका पदूकोणनं एका मुलाला आपल्या हातात उचललं आहे. आणि यासोबतच चर्चा सुरू झाली की शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' मध्ये दिसू शकतील.
ओटीटीवर ब्रह्मास्त्र रिलीज झाल्यानंतर स्पष्ट झालं आहे की लहानग्या शिवला कुशीत घेणारी महिला दुसरी-तिसरी कुणी नसून ती दीपिका पदूकोणच आहे. बोललं जात आहे की या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये देव भोवती सिनेमाचं कथानक गुंफलं जाणार आहे. देव हा शिवा म्हणजे रणबीरचा पिता आहे. ज्याला घेऊन दावा केला जात आहे की या भूमिकेसाठी शाहरुख खानची निवड झाली आहे. तर देवची पत्नी अमृता दीपिका पदूकोण साकारणार आहे. जे ब्रह्मास्त्रची रक्षा करताना दिसतील.
स्वतः अयान मुखर्जीनं यासंदर्भात कन्फर्म केलं होतं की तो ब्रह्मास्त्रचे तीन भाग काढणार आहे. तो म्हणालेला, जेव्हा त्यानं ब्रह्मास्त्रच्या स्क्रीप्टवर काम करणं सुरू केलं तेव्हा कोणाला कास्ट करायचं याविषयी त्याचं मत ठाम होतं. आपण लकी आहोत की आपल्या भारतात दर्जेदार कलाकार आहेत. आणि सगळ्यांनीच मला सहकार्य केलं.
ब्रह्मास्त्रने बॉक्सऑफिसवर ४५० करोडची कमाई केली. रिलीजच्या ८ आठवड्यानंतर हा सिनेमा डिस्ने प्लस हॉट स्टारवर ४ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.