Brahmastraचा विश्वविक्रम, जगातील चित्रपटांना बाॅलीवूडच्या सिनेमाने टाकले मागे

बायकाॅट गँगची निराशा, मात्र रणबीर कपूर आणि आलिया भटच्या गोट्यात आनंदाचे वातावरण
Brahmastra Worldwide Box Office Collection
Brahmastra Worldwide Box Office Collectionesakal
Updated on

Brahmastra Worldwide Box Office Collection Updates : अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र' किती यशस्वी याचं उत्तर बाॅक्स ऑफिसचे गणित समजणारा तज्ज्ञच सांगू शकतो. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटच्या (Alia Bhatt) या चित्रपटाने पहिल्याच दिवसाची कमाईने सर्वांना चकित केले होते आणि आता ३ दिवसांत अनेक मोठे विक्रम तोडले आहे.

Brahmastra Worldwide Box Office Collection
Brahmastra : पहिल्याच विकेण्डला 'ब्रह्मास्त्र'चं शतक, कमाई १०० कोटींपेक्षा अधिक

भारतात 'ब्रह्मास्त्र'ने पहिल्या दिवशी ३६ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पहिल्या आठवड्यात एवढी कमाई होईल अशी कोणीही अपेक्षा ठेवली नव्हती. मात्र अयान मुखर्जीने बनवलेल्या अस्त्रांचे हे विश्व ना केवळ देशात, तर जभरातील प्रेक्षकांना आवडले आहे. पहिल्याच दिवशी जागतिक बाॅक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रने (Brahmastra Worldwide Box Office Collection) जवळपास ७५ कोटींचे ग्राॅस कलेक्शन केले.

चित्रपटाची कमाईचा हा वारु येथेच थांबला नाही, तर तो पुढील दोन दिवस सुसाट राहिला. दुसऱ्या दिवशी चित्रपटाचा वर्ल्डवाईड ग्राॅस कलेक्शन, पहिल्या दिवसापेक्षा दुप्पट झाला. दोन दिवसानंतर 'ब्रह्मास्त्र'चा हा आकडा १६० कोटींवर गेला. आता तिसऱ्या दिवसाचा रिपोर्टही आला आहे. ब्रह्मास्त्रने असा एक विक्रम बनवला आहे, जो आतापर्यंत कोणत्याही बाॅलीवूड चित्रपटाने बनवलेला नाही. (Bollywood News)

Brahmastra Worldwide Box Office Collection
Akshay Kumar च्या हेअरड्रेसरचा मृत्यू; अभिनेता भावूक, म्हणाला...!

ब्रह्मास्त्रची जागतिक कमाई

वर्ल्डवाईड बाॅक्स ऑफिसवर आपल्या पहिल्या विकेण्डमध्ये ब्रह्मास्त्रने जवळपास २२५ कोटी रुपयांचे ग्राॅस कलेक्शन केले आहे. याबरोबरच वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये या विकेण्डला टाॅप चित्रपट बनला आहे. इथ पर्यंत पोहोचणारा ब्रह्मास्त्र हा बाॅलीवूडचा पहिला चित्रपट आहे.

त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चिनी चित्रपट 'गिव्ह मी फाईव्ह' आहे. या चित्रपटाने २१.५० मिलिटन डाॅलरचा व्यवसाय केला आहे. तिसऱ्या स्थानी दक्षिण कोरियाचा काॅन्फिडेन्शियल असाईनमेंट : इंटरनॅशनल आहे. गेल्या आठवड्यात त्याने १९.५० मिलियन डाॅलरचा जागतिक व्यवसाय केला.

Brahmastra Worldwide Box Office Collection
Tina Datta : अभिनेत्री टीना दत्ताने विकल्या भाज्या, लोक मात्र हैरान

तिसरा चित्रपट

ब्रह्मास्त्र बाॅलीवूडचा पहिला चित्रपट आहे जो विकेण्ड कलेक्शनमधून वर्ल्डवाइड बाॅक्स ऑफिस चार्टमध्ये टाॅपवर आहे. मात्र सर्व भारतीय चित्रपटांविषयी बोलाल तर तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रह्मास्त्रपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार विजयचा चित्रपट मास्टर आणि एस.एस. राजामौली यांचा आरआरआरनेही वर्ल्डवाईड बाॅक्स ऑफिसवर आपला पहिला विकेण्ड टाॅप केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.