Mouni Roy: 'ट्रोलर्स गेले उडत!' ब्रम्हास्त्रच्या 'जुनून'ला नेटकऱ्यांनी डिवचले

आलिया - रणबीरनंतर नेटकऱ्यांनी मौनीला धारेवर धरले आहे.
Bramhastra movie news
Bramhastra movie news esakal
Updated on

Bramhastra Movie: ब्रम्हास्त्र प्रदर्शित होऊन आता एक आठवडा होईल. सुरुवातीला मोठा विरोध झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद (Bollywood Movies) मिळताना दिसतो आहे. रणबीर - आलियाच्या ब्रम्हास्त्रवर बहिष्काराची मागणी करण्यात आली होती. काही नेटकऱ्यांनी ही मागणी (Mouni Roy Actress) जोरदारपणे मांडली. मात्र त्याचा परिणाम उलटा झाल्याचे दिसून आले आहे. प्रेक्षकांची भली मोठी गर्दी ही ब्रम्हास्त्र पाहण्यासाठी झाली होती. गेल्या शनिवार आणि रविवार तर या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल असल्याचे पाहायला मिळाले. यासगळ्यात ब्रम्हास्त्रमध्ये व्हिलनच्या भूमिकेत असलेली मौनी चर्चेत आली आहे.

ब्रम्हास्त्रमधील जवळपास प्रत्येक कलाकारांना ट्रोल करण्यात आले आहे. अपवाद टॉलीवूडचा नागार्जुन आणि बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा. याशिवाय रणबीर - आलियावर तर वैयक्तिक पातळीवर जाऊन आरोप, टीका करण्यात आली. यासगळ्यात आलियानं टीकाकारांना काय बोलायचे ते बोलू द्या. ब्रम्हास्त्रचे आकडे काय सांगतात हे मला महत्वाचे वाटते असे सांगितले होते. त्यानंतर मौनीला नेटकऱ्यांनी धारेवर धरल्याचे दिसून आले आहे. त्यावर मौनीनं देखील नेटकऱ्यांना जशास तसे सुनावले आहे.

मौनीनं ब्रम्हास्त्रमध्ये साकारलेली जुनून ही प्रेक्षकांना भावली आहे. अनेकांनी तिच्या त्या भूमिकेचे कौतूकही केले आहे. मौनी एवढी चांगली अभिनेत्री असु शकते असे आम्हाला वाटले नव्हते. तिच्या वाट्याला जेवढी भूमिका आली आहे त्यात तिनं भाव खाल्ला आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मौनीला आल्या आहेत. दुसरीकडे मौनीचे मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. एका मुलाखतीमध्ये मौनीनं या साऱ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मला माहिती आहे अनेकांना फार वाईट वाटले की, त्यांच्या मनानुसार लोकांनी ब्रम्हास्त्रला बॉयकॉट केले नाही. त्याला मिळालेलं यश हे अनेकांना आवड़लेलं नाही.

Bramhastra movie news
Bramhastra: आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'पुढं सारं फिकं! ती जिंकली

मला जी लोकं ट्रोल करतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे मला त्याचा काहीही फरक पडत नाही. ट्रोलर्सला मी भाव देत नाही. अशा लोकांची कीव येते जे चित्रपट पाहण्यापूर्वीच बॉयकॉटची मागणी करु लागतात. जेव्हा तुम्ही चित्रपट पाहता तेव्हा त्यावर दिलेली प्रतिक्रिया मी समजू शकते. अनेकजण तर त्यांना काय वाटते हेच लिहून मोकळे होतात. चित्रपट न पाहता पूर्वग्रह दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेले विचार हे कसे असतील याची कल्पनाच न केलेली बरी. अशा शब्दांत मौनीनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Bramhastra movie news
Bramhastra: सगळी आकडेवारी खोटी! PVR CEO चा मोठा गौप्यस्फोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.