महेश भूपती-लिएंडर पेसवर 'ब्रेकपॉइंट' माहितीपटाची निर्मिती

क्रीडापटूंवर बायोपिक निर्मिती हे काही प्रेक्षकांसाठी नवीन नाही.
महेश भूपती-लिएंडर पेसवर 'ब्रेकपॉइंट' माहितीपटाची निर्मिती
Updated on

मुंबई - क्रीडापटूंवर बायोपिक निर्मिती हे काही प्रेक्षकांसाठी नवीन नाही. यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर कलाकृतींची निर्मिती करण्यात आलीय. सध्या क्रिकेटपटूंवरील बायोपिकचे फॅड आहे. मात्र भारताला टेनिस विश्वात जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या महेश भुपती आणि लिएंडर पेसवर माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तो माहितीपट आता प्रदर्शनासाठी सज्ज असल्याची माहिती मिळाली आहे. बहुआयामी लेखक-चित्रपट निर्माता अश्विनी अय्यर तिवारी यांनी चँपियन्स महेश भूपति आणि लिएंडर पेस यांच्यावरील आपला माहितीपट नुकताच पूर्ण केला आहे. या माहितीपटाचे लेखन-दिग्दर्शन स्वत: अश्विनीने केले आहे.

महेश भूपति-लिएंडर पेस या जोडगोळीवर आधारित माहितीपटावर काम करताना अश्विनी अय्यर तिवारीची या दोन चँपियन्ससोबत आयुष्यभारासाठी मैत्री झाली. हे आमच्यातील सुंदर सहयोगाचे प्रतीक असल्याचे अश्विनीने म्हटले आहे. या माहितीपटावर जवळपास दीड वर्ष सुरु असलेले काम पूर्ण झाल्याचे जाहीर करताना तिने आपल्या सोशल मीडियावर या प्रवासाच्या आठवणी शेयर केल्या आहेत. माहितीपटासाठी दोन अतिशय प्रतिभावान चँपियन्सची माहिती संकलित करणे आणि लिहिणे हे देखील नितेश, पीयूष आणि माझ्यासाठी पहिल्याच अनुभव होता.

आम्ही खूप आभारी आहोत आमचे स्टूडियो पार्टनर्स झी 5, ज्यांच्यासोबत या महामारीच्या कठिण काळात देखील जगभर मोठ्या प्रमाणात याची निर्मित करण्यात आम्ही यशस्वी झालो. प्रोडक्शन, डायरेक्शन, एकाउंट्स टीम आणि बिमल पारेख यांचेही अश्विनी यांनी आभार मानले आहेत. या माहितीपटाचे नाव 'ब्रेकपॉइंट' असून त्याचा प्रीमियर ZEE5 वर होणार आहे. अश्विनीने या आधी 'नील बट्टे सन्नाटा' आणि 'बरेली की बर्फी' सारख्या प्रकल्पांसोबत चित्रपट निर्माता म्हणून काम केले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'मॅपिंग लव्ह' या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

महेश भूपती-लिएंडर पेसवर 'ब्रेकपॉइंट' माहितीपटाची निर्मिती
उझबेकिस्तानने अफगाणिस्तानचं जेट विमान पाडलं, ४६ विमानांचं जबरदस्ती लँडिंग

तसेच, सोनी लिववरील 'फाडू' या वेब सीरिजद्वारे अश्विनी या ओटीटीच्या जगात पदार्पण करण्यास सज्ज आहे. तसेच, सध्या नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या जीवनचरित्रावर काम करत असून हा त्यांच्या आवडत्या प्रकल्पांपैकी एक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.