मुंबई - सध्या जगभरात कोरियनच्या एका बँडची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. विशेषत तरुणांमध्ये त्या बँडनं जोरदार लोकप्रियता मिळवलेली आहे. त्याचा सगळीकडे बोलबालाही आहे. अशा बीटीएस बँडच्या एका गायकानं सध्याच्या परिस्थितीवर एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. तसंही बीटीएसधील bts गायक हे नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे गायक आहे. त्यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या अफवाही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गाड्या, त्यांची संपत्ती, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या मेसेजनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं जगभरात थैंमान घातलं आहे. त्याचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रांवरही झाल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात मनोरंजविश्वालाही मोठा फटका बसला आहे. कित्येक निर्माते आणि दिग्दर्शक हे चिंतेत सापडले आहेत. त्यांना आपल्या चित्रपट प्रदर्शनाचे वेध लागले आहेत. मात्र अजूनही काही ठिकाणी थिएटर अजूनही सुरु झालेले नाहीत. सध्या देशातील तामिळनाडूमध्ये थिएटर सुरु झाले आहे. महाराष्ट्राच्याबाबत अजून निर्णय व्हायचा आहे. कोरोनामुळे बिटीएसचे गायकही वैतागले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून त्यांनी एकही लाईव्ह कॉन्सर्ट केलेला नाही. त्याचा परिणाम त्यांच्या लोकप्रियतेवरही झाला आहे. बिलबोर्डच्या हॉट १०० चार्ट गाण्यांमध्येही त्यांची गाणी ही आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
बीटीएसमध्ये सात गायक आहेत. त्यांच्याकडे आता कमी वेळ शिल्लक असून आणखी काही दिवसांनी ते सैन्यात दाखल होणार आहेत. अशी माहिती त्यांच्यातील एक गायक जिमिननं दिली आहे. त्यांच्या देशात सैन्यात भरती होणं हे अनिवार्य आहे. यापूर्वी बीटीएसनं केलेल्या कॉन्सर्टला जगभर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्यांचे चाहते जगभर पसरले आहेत. त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. भारतातही त्यांना ऐकणारा वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर या बँडची क्रेझ मोठी आहे. अशावेळी त्यांना लाइव्ह कॉन्सर्ट करायला न जमणं ही सलणारी बाब आहे. त्याविषयी त्या गायकानं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बीटीएसनं २०२० मध्ये एका व्हर्च्युअल कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.
बीटीएसचा गायक जिमिन (Jimin Live Perfrormance) याला लाइव्ह प्रेक्षकांसमोर न येता येणं याचे वाईट वाटत असल्याचे सांगितले आहे. आपल्याला कोरोनानं खूप वेगळ्या परिस्थितीत सोडलं असल्याचं त्यानं सांगितलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांपासून आपण लांबवर जात असल्याची खंतही त्यांनं बोलून दाखवली आहे. आम्ही सगळेजण ही महामारी कधी संपते याची वाट पाहत आहोत. आम्ही जेव्हा एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गेलो तेव्हा तिथे कुणीही नव्हतं. ते पाहिल्यावर खूप वाईट वाटलं. आता जर लोकंच नाहीत तर कुणासाठी गायचं हा प्रश्न असल्याचे जिमिननं (Jimin Live Perfrormance) सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.