Bullet Rani Arrested : शिवांगी डबास अटकेत; पोलिसांवर हात उचलल्याचा आरोप

Shivangi Dabas Arrested News
Shivangi Dabas Arrested NewsShivangi Dabas Arrested News
Updated on

Shivangi Dabas Arrested News सोशल मीडियावर ‘मिस जाटनी’ आणि ‘बुलेट रानी’ नावाने प्रसिद्ध असलेली शिवांगी डबासला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. शिवांगी पोलिस कर्मचाऱ्याच्या स्कूटीला धडकल्याचा आरोप आहे. ‘पोलिस कर्मचाऱ्याची माफी मागितली. आईनेही पायाला हात लावून माफी मागितली. मात्र, पोलिसांनी मारहाण केली’ शिवांगीने म्हटले आहे. त्याचवेळी शिवांगीने हात उचलल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे.

शिवांगी डबास सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. शिवांगी डबास मैत्रिणीसोबत घरी परतत होती. यावेळी तिने महिला पोलिस कर्मचारी ज्योती शर्मा यांना स्कूटीने धडक दिली. शिवांगी व्हिडिओमध्ये महिला पोलिसाशी वाद घालताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये शिवांगी म्हणत आहे की, ‘मी तुझी एकदा माफी मागितली आहे. तरीही तू माझ्यावर हात उचलत आहे.’

दोघांमधील वाद वाढल्यानंतर महिला पोलिस कर्मचारी ज्योतीने या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी शिवांगीला घरातून पोलिस ठाण्यात आणले. मधुबन बापुधाम पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी शिवांगीविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Shivangi Dabas Arrested News
Shah Rukh Khan : शाहरुखने डॉन ३ नाकारला? शाहरुख स्क्रिप्ट निवडण्याची घाई करणार नाही

वादानंतर महिला पोलिस कर्मचाऱ्याची अनेकदा माफी मागितली होती. आईनेही अनेकवेळा तिचे पाय स्पर्श केले होते. यानंतरही महिला पोलिसाने मारहाण केली. पोलिस स्टेशनला जात असताना धक्काबुक्की करून थापड मारली. आम्ही दोघेही चुकीच्या बाजूने येत होतो, असे शिवांगीने सांगितले.

काल रात्री महिला पोलिस कर्मचारी ज्योती शर्मा डायल १०० ची ड्युटी संपवून घरी परतत असताना शिवांगीने त्यांच्या स्कूटीला धडक दिली. त्यानंतर शिवांगीने महिला पोलिस कर्मचाऱ्याला हात उचलला, असे सीओ सदर आकाश पटेल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()