Cannes Festival : कान्स फेस्टिव्हलमध्ये रीचवल्या जातात वाईनच्या 18 हजार बाटल्या

16 मे रोजी सुरू झालेला कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 27 मे पर्यंत चालणार
Cannes Festival
Cannes Festival esakal
Updated on

Cannes Festival : 16 मे रोजी सुरू झालेला कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 27 मे पर्यंत चालणार आहे. दरवर्षी कान फिल्म फेस्टिव्हलची जगभरात चर्चा होते. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर सर्व सेलिब्रिटी आपली फॅशन आणि सौंदर्य दाखवतात. यावेळी कान्समध्ये बॉलीवूड सौंदर्यवतीही रेड कार्पेटवर आपल्या ग्लॅमरस स्टाईलची झलक दाखवत आहेत.

Cannes Festival
Share Market Tips: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

कान फेस्टिव्हलमधील सौंदर्यवतींची जादू तुम्हाला आधीच माहीत आहे. पण एक मिनिट! या फिल्म फेस्टिव्हलमधील खाद्यपदार्थांच्या मेनूबद्दल तुम्ही कधी लक्ष दिलंय का? नाही, फ्रेंच रिव्हिएरामध्ये सुरू असलेल्या या उत्सवात पाहुण्यांना काय दिले जाते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Cannes Festival
Maruti cars May 2023 Discount : मारुतीच्या या 8 गाड्यांवर मिळते आहे बंपर सूट, त्वरा करा

कान फेस्टिव्हल डिश

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कान फेस्टिव्हलमधील पाहुण्यांच्या जेवणाची जबाबदारी हॉटेल बॅरिएरे ल'मॅजेस्टिकची आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये फक्त डिनरचा खर्च 3.47 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.8 कोटी रुपये आहे.

इनसाइडर वेबसाइटवरील वृत्तानुसार, जगातील सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 11 दिवसांच्या कालावधीत येथे येणाऱ्या पाहुण्यांना 340 किलो फॉई ग्रास नावाची डिश सर्व्ह केली जाते. बदकांच्या यकृतापासून ही डिश तयार केली जाते.

Cannes Festival
Diesel Car : डिझेलवर चालणारी कार खरेदी करत असाल तर थांबा! डिझेल वाहनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव

जगातील सर्वात महाग डिश

इतकेच नाही तर हे हॉटेल पाहुण्यांना 49 किलो कॅविअर सर्व्ह करते. ही जगातील सर्वात महागडी डिश मानली जाते. कॅविअर तयार करण्यासाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्च येतो. या दोन पदार्थांशिवाय कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाहुण्यांना 2 हजार किलो क्रॅबची डिशही दिली जाते.

Cannes Festival
Mulberry Fruit Health Benefits : फॅटी लिव्हर, weigh loss सगळ्यावर गुणकारी आहे हे छोट फळ;एकदा खाऊन तर बघा!

शॅम्पेन आणि वाइन देखील मेनूमध्ये

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये खास पदार्थांव्यतिरिक्त, पाहुण्यांना वाइन आणि शॅम्पेन देखील दिले जाते. हॉलिवूड रिपोर्टरच्या मते, संपूर्ण उत्सवादरम्यान सुमारे 18,500 ग्लास वाइन आणि शॅम्पेन सर्व्ह केली जाते. या कार्यक्रमात एक खास 1990 Chateau Petrus सेवा दिली जाते. असं मानलं जातं की एका बोल्टची किंमत 9390 युएस डॉलर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.