Cannes Film Festival 2022: जगभरातील सिनेप्रेक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात. यंदाचा फेस्टिव्हल कान्स (फ्रान्स) येथे 17 मे ते 28 मे दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार (TV Entertainment News) आहे. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, देशातील चित्रिकरण व पर्यटन स्थळांचे महत्व वाढविणे या हेतुने मराठी चित्रपटांचा सहभाग (Entertainment News) कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येतो. या महोत्सवात निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे प्रतिनिधी सहभागी होतात. ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी माहिती दिली.
या वर्षी कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 च्या फिल्म मार्केटिंग विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाठवावयाच्या ३ मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत श्री. अशोक राणे, श्री. सतिश जकातदार, श्रीमती किशोरी शहाणे-विज, श्री. धीरज मेश्राम, श्री मनोज कदम, श्री. महेंद्र तेरेदेसाई व श्री. दिलीप ठाकुर या ७ तज्ञ सदस्यांची परिक्षण समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 32 चित्रपटांचे परिक्षण करुन एकमताने नटराज एन्टरटेनमेंट निर्मित “पोटरा", नाईन आर्चस पिक्चर कंपनी निर्मित “कारखानीसांची वारी” आणि बीइंग क्रिएटिव्ह पिक्चर्स निर्मित “तिचं शहर होणं" या चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे.
‘पोटरा’ हा ग्रामीण भारतातील मुलींच्या दुर्दशेवर परिणाम करणाऱ्या प्रतिगामी सामाजिक प्रथा परंपरावर प्रकाश टाकणारा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा गीता भोवती फिरते. गीता एक किशोरवयीन मुलगी आहे जी अभ्यासात आणि अभ्यासेतर क्रियाकलापांमध्ये उत्कृष्ट आहे. गीताला मासिक पाळी येताच तिची आज्जी तिच्या लग्नासाठी तिच्यासाठी वडिलांना लवकारात लवकर वर शोधण्यासाठी सांगते. ही कथा एका मार्मिक मुद्द्यावर येऊन संपते जी शिक्षण आणि प्रतिगामी पितृसत्ताक रूढी परंपरा यांच्यातील संघर्षावर प्रकाश टाकते. ज्यामुळे मुलीच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो.
'पोटरा' चा अर्थ 'कच्ची ज्वारी' असा होतो. आपल्या कथेद्वारे लेखक/दिग्दर्शकाने एक साधर्म्य रेखाटले आहे की मुलगी किंवा कच्ची ज्वारी केवळ वयात आली म्हणून नाही तर परिपक्व आणि प्रौढ झाल्यावरच जीवनचक्र चालू ठेवू शकते. चित्रपटात वापरलेली लोकगीत… युवा दिग्दर्शक शंकर अर्जुन धोत्रे यांनी पोटरा या चित्रपटाचे पटकथा, संवाद व दिग्दर्शक केले आहे. मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथील रहिवासी असलेले दिग्दर्शक शंकर धोत्रे यांनी पोटरा या चित्रपटात वयात आलेल्या मुलीसंदर्भात भाष्य करण्यात आले आहे.
पोटरा या चित्रपटात मुख्य भूमिका छकुली प्रल्हाद देवकर हिने साकारली आहे. छकुली देवकर आष्टी येथील रहिवासी असून तिचा रोजचा उदरनिर्वाह काटकसरीचा आहे. तिचा हा पहिला चित्रपट असून 20 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. दिग्दर्शक शंकर धोत्रे यांच्या पोटरा या चित्रपटाने उत्कृष्ट मराठी चित्रपट, उत्कृष्ट पटकथा व उत्कृष्ट अभिनेत्री या तीन प्रमुख पुरस्कार मिळविला आहे. तसेच या चित्रपटास मानाचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. तसेच ५ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोटरा चित्रपट विजयी झालेला आहें।
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.